Divyanka Tripathi | दिव्यांकाप्रमाणे घरगुती स्क्रब वापरा आणि कोरड्या त्वचेच्या समस्येला करा बाय-बाय
कोरड्या त्वचेच्या समस्येपासून बचावासाठी टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी घरी तयार केलेल्या स्क्रबचा वापर करते.
मुंबई : थंडीचे दिवस सुरु होताच त्वचेसंबंधी अनेक समस्या उद्भवू लागतात (Divyanka Tripathi Home Made Face Scrub). यामध्ये त्वचा कोरडी पडणे ही सर्वात मोठी समस्या असते. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांची त्वचा निस्तेज आणि कोरडी पडते. हिवाळा संपेपर्यंत ही समस्या काही सुटत नाही (Divyanka Tripathi Home Made Face Scrub).
View this post on Instagram
सामान्यत: अनेकजण कोरड्या त्वचेला हंगामी समस्या समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्वचा डॅमेज होते आणि त्वचेवर ड्राय स्किनचा थर दिसू लागतो. शरिरात पाण्याच्या कमतरतेनेही त्वचा कोरडी पडते आणि ओठही फाटू लागतात. या समस्यांपासून वाचण्यासाठी टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी घरी तयार केलेल्या स्क्रबचा वापर करते. आज आपण तिचेच काही घरगुती उपाय जाणून घेमार आहोत.
हळद आणि बेसन स्क्रब
जर तुमची त्वचा खूप ड्राय आहे तर हा स्क्रब तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. हा स्क्रब तयार करण्यासाठी एक चमचा हळद, एक चमचा बेसन आणि दूधाला एकत्र करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेला बाहेर काढतो. बेसन आणि हळदीचा स्क्रब हा अँटी फंगल म्हणून काम करतो. तर दुधामुळे त्वचा मॉईश्चराईज होते (Divyanka Tripathi Home Made Face Scrub).
साखरेचं स्क्रब
आधी चेहरा पाण्याने छावन धुवून घ्या. त्यानंतर रिपाइंड साखरेने हकल्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. साखर चेहऱ्यावर मसाज करत असताना आपोआप वितळते. ही नैसर्गिक स्क्रबचं काम करते. यामुळे चेहऱ्यावरील कोरड्या त्वचेचा थर निघतो आणि त्वचा मऊ होते.
मिठ आणि एरंडेल तेल स्क्रब
कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हा स्क्रब सर्वात चांगला उपाय आहे. यासाठी अर्धा चमचा मिठ आणि एक चमचा एरंडेल तेलाला एकत्र करुन घ्या. त्यानंतर याला सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. या स्क्रबमुळे चेहऱ्यावरील घाण आणि टॅनिंग निघते. सोबतच त्वचा मॉईश्चराईजही होते. थोड्यावेलाने कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
Hina Khan | हीना खानच्या गुलाबी गालांचं गुपित उलगडलं, जाणून घ्या…https://t.co/PhpczHBH7w#Hinakhan #ActreesHinaKhan #SkinCareTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
Divyanka Tripathi Home Made Face Scrub
संबंधित बातम्या :
Baking Soda Scrub | हिवाळ्यात त्वचा निस्तेज झाली आहे, तर बेकिंग सोडा स्क्रब नक्की ट्राय करा
Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!
Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!
Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!