फूड अॅलर्जी काय असतं? अन्न खाल्ल्यानंतर शरीरात काय होतं?
फूड अॅलर्जीमुळे सूज येणे, उलटी होणं, छातीत जळजळणं, थकवा येणं आणि पोटात गडबड होणं आदी समस्या निर्माण होतात. फूड अॅलर्जी ओळखणं थोडं कठिण आहे. त्याची असंख्य लक्षणं आहेत. पण अन्न खाल्ल्यावर कोणताही त्रास झाल्यास डॉक्टरांना दाखवणं सर्वात चांगलं असतं. ज्या पदार्थाने तुम्हाला त्रास होतो, शरीरावर त्याचे परिणाम होतात, ते पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
गेल्या काही दिवसांपासून फूड अॅलर्जीच्या असंख्य बातम्या वाचनात येत आहेत. पण फूड अॅलर्जी का होते? कशामुळे होते? हे माहीत आहे का? एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर अॅलर्जी होते. त्यालाच फूड अॅलर्जी म्हटलं जातं. तुमचं शरीर कोणतेही पदार्थ स्वीकारत नाही. त्याच्या विरोधात प्रतिक्रिया द्यायला लागतं. त्यामुळे फूड अॅलर्जीची समस्या निर्माण होते. तरुणांमध्ये खाण्यापिण्यातून होणारी अॅलर्जी वाढताना दिसत आहे. एका रिसर्चनुसार 10 टक्क्याहून अधिक तरुणांमध्ये अॅलर्जी मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकदा अॅलर्जी सिव्हीअर आणि नॉर्मल असते. फूड अॅलर्जीचं सर्वात मोठं कारण काय आहे हे पाहुया…
फूड अॅलर्जीचे लक्षण
एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर अंगाला खाज येते, त्वचेवर चट्टे उठतात
काही पदार्थ खाल्ल्यावर ओठ सूजतात. जीभ जड पडते. अॅलर्जीचा परिणाम फुफ्फुसावरही होतो
गळ्यात खवखवणे, खाज येणे सुरू होतं, आवाज कर्कश होतो, पाणी, अन्न गिळताना त्रास होतो, गळ्याला सूज येते
श्वास घेण्यास अडचण येते
श्वास घेताना घरघर आवाज येतो, छाती आवळली जाते, अचानक खोकला सुरू होतो
काही पदार्थ खाल्ल्यावर उलटी येते, पोटात मुरडा येतो
त्वचा पिवळी किंवा निळी पडते
काही पदार्थ खाल्ल्यावर चक्कर येते
फूड अॅलर्जीचं कारण काय?
जेव्हा तुमची इम्यून सिस्टिम एखाद्या विशिष्ट पदार्थाबाबत अधिक प्रतिक्रिया देत असेल तर फूड अॅलर्जी होते. आपल्या शरीरात एक प्रोटीन असतं, त्याला इम्युनोग्लोबुलिन म्हटलं जातं. वेगवेगळे इम्युनोग्लोबुलिन वेगवेगळं काम करतात. शरीराला धोकादायक असलेली एखादी गोष्ट म्हणजे, बॅक्टेरिया, कँसर कोशिका, इम्युनोग्लोबुलिन ई ओळखून वेगळी करते. शरीराला पचणार नाही असं जेवण तुम्ही घेतल्यावर तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे अॅलर्जी होते आणि त्याचे लक्षण शरीरावर दिसतात.
या कारणाने फूड अॅलर्जी होऊ शकते
आधी अॅलर्जी झाली असेल तर
दमा, वातावरणानुसार होणारी अॅलर्जी आणि एक्झिमा
मोठ्यांच्या तुलनेत छोट्या मुलांना फूड अॅलर्जीचा धोका अधिक असतो
एखाद्या अन्नाबाबत अधिक सेन्सिटिव्ह असणं
खराब अन्न खाणं
शिळं अन्न खाणं
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)