Aloe Vera For Skin Care : त्वचेचे टॅनिंग टाळण्यासाठी कोरफडीचा असा करा वापर

हानिकारक युव्ही किरणांमुळे अथवा अतिनील किरणांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. त्वचेवर जमा झालेल्या टॅनमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. अशावेळी तुम्ही कोरफडीचा वापर सनस्क्रीन म्हणूनही करू शकता. हे आपल्या त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यास मदत करेल

Aloe Vera For Skin Care : त्वचेचे टॅनिंग टाळण्यासाठी कोरफडीचा असा करा वापर
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 8:11 AM

नवी दिल्ली : हानिकारक युव्ही किरणांमुळे अथवा अतिनील किरणांमुळे त्वचेचे (harmful for skin) खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत, सनस्क्रीनचा (sunscreen) वापर केल्याने या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्याचे काम करतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण महागडी उत्पादने वापरतो. मात्र अशा केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी (chemical products) तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी देखील वापरू शकता. केमिकल युक्त उत्पादने तुमच्या त्वचेला दीर्घकाळ हानी पोहोचवण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत तुम्ही कोरफडीसारख्या नैसर्गिक घटकांचा सनस्क्रीन म्हणून वापर करू शकता. कोरफड ही अतिशय औषधी असून अनेक कारणांसाठी तिचा वापर केला जातो. त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट (antioxidant) गुणधर्म असतात. तसेच फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे संरक्षण करण्यास कोरफड मदत करते.

कोरफडीसह घरात उपलब्ध असलेल्या इतर अनेक नैसर्गिक गोष्टी मिक्स करून त्यांचे मिश्रण तुम्ही सनस्क्रीन म्हणून वापरू शकता. घरगुती उपायांचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेला इजा करत नाहीत, त्याचा फायदाच होऊ शकतो. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

1) एका बाऊलमध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा कोरफडीचे जेल मिक्स करा. नंतर तुम्ही या मिश्रणाचा सनस्क्रीन म्हणून वापर करू शकता. त्याशिवाय तुम्ही या मिश्रणाचे क्युब्स तयार करुन त्याचाही त्वचेसाठी वापर करू शकता. घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही त्वचेसाठी हे क्यूब्स वापरू शकता. कोरफड तुमची त्वचा मऊ ठेवण्यासही मदत करते.

2) एका बाऊलमध्ये कोरफडीचा रस घ्या. त्यात एक चमचा खोबरेल तेल घाला. नंतर त्यामध्ये पेपरमिंट ऑइलचे 5 थेंब घालावेत. हे तिनही घटक नीट मिक्स करून त्वचेसाठी वापरा. यामुळे टॅनिंगपासून बचाव होण्यास मदत होते.

3) कोरफडीचा थोडा रस किंवा जेल एका भांड्यात काढूव घ्या. त्यात अक्रोडचे तेल, शिया बटर, खोबरेल तेल आणि झिंक ऑक्साईड घाला. या गोष्टी नीट मिक्स करून तुम्ही सनस्क्रीनप्रमाणे वापरू शकता. याच्या वापराने त्वचेचे हानिकारक किरणांपासून रक्षण होण्यास मदत होते व टॅनिंगचा त्रास टाळता येतो.

4) एका वाटीमध्ये कोरफडीचे जेल काढून घ्या. व्हिटॅमिन ई तेलाची कॅप्सूल कापून त्यातील तेल त्यामध्ये घाला. तसेच थोडंसं सूर्यफुलाचं तेल आणि झिंक ऑक्साईडही घालावे. या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि सनस्क्रीनप्रमाणे त्याचा वापर करा. हे मिश्रण अतिनील किरणांपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करते. तसेच टॅनिंगचा प्रभावही कमी करण्यास मदत करते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.