Skin Care : केळं खाऊन साल टाकून देता ? असं करू नका, डोळ्यांची ‘ही’ समस्या कमी करण्यासाठी ठरतं साल प्रभावी

साधारणपणे आपण केळं खाल्ल्यानंतर त्याचे साल कचऱ्याच्या टोपलीच टाकून देतो. पण याच केळ्याच्या सालीमध्‍ये असे अनेक पौष्टिक घटक आहेत जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. डोळ्यांखालची काळी वर्तुळं म्हणजेच डार्क सर्कल्स घालवण्यासाठीही त्याचा वापर करता येऊ शकतो.

Skin Care : केळं खाऊन साल टाकून देता ? असं करू नका, डोळ्यांची 'ही' समस्या कमी करण्यासाठी ठरतं साल प्रभावी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 12:22 PM

नवी दिल्ली : केळं (Banana) हे अतिशय चविष्ट व पौष्टिक फळ आहे. त्यातील अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात, हे तर आपल्याला माहीत आहेच. पण केळ्याप्रमाणेच त्याचे सालही खूप फायदेशीर असते, हे तुम्हाला माहीत आहे का? साधारणपणे आपण केळं खाल्ल्यानंतर त्याचे साल कचरा समजून आपण केराच्या टोपलीत अथवा डस्टबीनमध्ये (dustbin) फेकून देतो. पण त्यात असे अनेक घटक आहेत ज्यांचा त्वचेला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. केळ्याचे साल हे जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि फायबरने समृद्ध असून ते त्वचा आणि केसांसाठी खूप (benefits of banana peel)उपयुक्त ठरत आहे.

इतकेच नव्हे तर त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात आणि सर्व प्रकारचे नुकसान भरून काढण्यातही खूप मदत करतात. जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं अर्थात डार्क सर्कल्स असतील व ती मिटवण्यात तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्ही केळ्याच्या सालीची मदत घेऊ शकता. यामुळे त्वचा डागरहित आणि चमकदार होऊ शकते. याचा उपयोग कसा करावा ते जाणून घेऊया.

केळ्याच्या सालीने अशी दूर करा डार्क सर्कल्स

हे सुद्धा वाचा

पहिला उपाय

– सर्वप्रथम केळीची साल सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.

– नंतर ते फ्रीजमधून बाहेर काढा आणि 15 ते 20 मिनिटे डोळ्यांखाली ठेवा.

– हे साल काढल्यानंतर तुमचा चेहरा काही वेळ तसाच राहू द्या. 5 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा.

– तुम्ही याचा वापर आठवड्यातून 2 ते 3 दिवस करा. काही दिवसात फरक दिसून येईल.

दुसरा उपाय

-केळ्याचे साल सोलून मिक्सरमधून बारीक करून घ्या व एका भांड्यात ठेवा.

– आता या केळीच्या सालीच्या पेस्टमध्ये एक चमचा मध आणि 1 ते 2 थेंब लिंबाचा रस घाला.

– आता ही पेस्ट नीट मिसळा आणि 2 मिनिटे ठेवून मुरू द्या.

– ही पेस्ट डार्क सर्कल असलेल्या भागावर लावा आणि 5 ते 10 मिनिटांनी चेहरा धुवा.

– मात्र ही पेस्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, जेणेकरून त्वचेवर कोणतीही जळजळ किंवा दुष्परिणाम होणार नाहीत.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.