Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रीन टी बॅग्ज्‌चा ‘पैसा वसूल’ वापर ! त्वचेपासून केसांपर्यत अनेक फायदे

‘ग्रीन टी’चा वापर आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठी खूप फायद्याचा ठरु शकतो. आपण वापरलेली ‘ग्रीन टी’ फेकून देण्यापेक्षा त्याचा पुन्हा वापर केल्यास त्याचा पूर्ण लाभ मिळू शकतो. त्यामुळे ‘ग्रीन टी’मुळे आपल्या आरोग्यासोबत त्वचा व केस दोन्ही निरोगी राहण्यास मदत होईल.

ग्रीन टी बॅग्ज्‌चा ‘पैसा वसूल’ वापर ! त्वचेपासून केसांपर्यत अनेक फायदे
green tea
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 9:13 AM

‘ग्रीन टी’ आरोग्यासाठी (Health) अतिशय उत्तम मानली जात असते. ‘ग्रीन टी’ पिण्याचे अनेक फायदेसुध्दा आपण ऐकले आहेत. परंतु अनेकदा आपण ‘ग्रीन टी’पिल्यानंतर उर्वरीत बॅग (green tea bags) फेकून देत असतो. परंतु याच उर्वरित बॅगचा वापर करुन आपण त्यातून आपल्या त्वचेचे व केसांचेदेखील आरोग्य सुधारु शकतो. आपण ‘ग्रीन टी’च्या बॅग्ज्‌चा पुन्हा वापर करुन आपल्या त्वचेची व केसांची (hair benefit) अनेक समस्यांपासून सुटका करु शकतो. त्यामुळे ‘ग्रीन टी’च्या वापरानंतर त्याच्या बॅग फेकण्यापेक्षा त्याचा त्वचा व केसांसाठी पुन्हा कसा वापर करावा? तसेच त्वचा व केसांवर नेमका काय फायदा होतो हेदेखील पाहणार आहोत.

काळे वर्तुळ व पुरळांसाठी फायदेशीर

तुम्हाला जर डोळ्यांखाली काळे वर्तुळ व पुरळांची समस्या असेल तर ग्रीन टी बॅग्ज्‌ तुमच्या उपयोगात येउ शकते. ग्रीन टी बॅग्ज्‌च्या वापरानंतर त्यांना साधारणत: दहा मिनीट फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर बॅग्ज्‌ बाहेर काढून किमान दहा मिनीट आपल्या डोळ्यांजवळ ठेवा. यातून तुम्हाला खूप फायदा मिळेल. जर तुम्हाला पुरळ असतील तर फ्रिजमध्ये ठेवलेल्या बॅग्ज्‌ पुरळांवर दहा मिनीट ठेवा.

बॅग्ज्‌पासून स्क्रब तयार करा

ग्रीन टीच्या वापरानंतर त्याच्या बॅग्ज्‌ फेकून देण्यापेक्षा त्यापासून घरगुती स्क्रबचीही निर्मिती होउ शकते. यासाठी तुम्हाला बॅग्ज्‌मधून चहाच्या पत्त्यांना बाहेर काढावे लागेल. त्यात मध मिसळावे. त्यानंतर ते त्वचेवर काही वेळ लावून ठेवावे. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचेवर मसाज करावी. यामुळे चेहर्यावरील मृत पेशी निघून जातील.

एक्सफोलिएटिंग फेसमास्क

ग्रीन टीच्या माध्यमातून एक्सफोलिएटिंग फेसमास्क तयार केले जाउ शकते. यासाठी ग्रीन टी ला एका बाउलमध्ये काढून घ्यावे. त्यात मध घालावे. त्यात बेकिंग सोडा टाकावा. आता हे मिश्रण एकजीव करुन चेहर्यावर लावावे. 10 मिनीट ठेवल्यानंतर साध्या पाण्याने धुवावे. यातून त्वचेवर चांगली चमक निर्माण होते.

चमकदार केसांसाठी वापर

आपल्या केसांवरील चमक गेली असेल तर यावर ग्रीन टी फायदेशीर ठरु शकते. यासाठी ग्रीन टीच्या बॅग्ज्‌ पाण्यात टाकून त्यांना उकळावे. त्यानंतर रात्रभर हे पाणी तसचं राहू द्यावे. सकाळी या पाण्याने केस धुवावे, असे आठवड्यातून दोन वेळा करावे, केसांना चमक निर्माण होईल.

संबंधित बातम्या : 

उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहून वजन कमी करायचे आहे? मग हे काकडीचे पराठे नक्की ट्राय करा!

Health care : या 5 पदार्थांमुळे आतड्यातील अल्सरचा धोका वाढतो, जाणून घ्या या पदार्थांबद्दल!

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.