‘या’ मास्कच्या मदतीने व्हाइटहेड्सची समस्या होईल कमी
व्हाइटहेड्सच्या समस्येमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होत असेल तर छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
नवी दिल्ली – आपल्या चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, ब्लॅकहेड्स (blackheads) यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होतो. ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा चेहरा तेलकट असतो तेव्हा हे मुख्यतः घडते. ब्लॅकहेड्स सारखाच व्हाईटहेड्समुळेही (whiteheads) त्रास होतो. म्हणूनच ते नीट स्वच्छ करणे आवश्यक आहे. व्हाईटहेड्स हा मुरुमांचा एक प्रकार आहे जो डेड स्कीन (dead skin) , तेल आणि बॅक्टेरिया त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकल्यावर तयार होतो.
व्हाइडहेड्सचे कारण काय ?
तुमच्या त्वचेची छिद्र बंद झाल्यास व्हाइटहेड्सची समस्या होऊ शकते. अनेक कारणांमुळे छिद्रं ब्लॉक होतात. हार्मोनल बदलांमुळे देखील छिद्रं ब्लॉक होऊ शकतात. चेहरा अति तेलकट झाल्यास व्हाईटहेड्स येतात. चेहरा, पाठ आणि खांदे अशा ठिकाणी व्हाईटहेड्स आढळतात.
हळदीमुळे होतो फायदा
हळद ही खूप गुणकारी असते. स्वयंपाकापासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंत तसेच औषध म्हणूनही हळदीचा वापर केला जातो. व्हाइटहेड्सची त्रास कमी करण्यासाठी हळदीचा मास्क गुणकारी ठरतो.
साहित्य – अर्धा चमचा हळद, 1 चमचा मध
कृती – एका लहान बाऊलमध्ये 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा मध घाला. ते मिक्स करून चेहऱ्यावर लावा. मात्र हे मिश्रण डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागावर लावणे टाळा. ते वाळल्यानंतर चेहरा धुवा. हळद आणि मधापासून बनवलेल्या या मास्कमुळे व्हाईटहेड्सची समस्या कमी होईल. या मास्कमुळे तुमचा चेहरा चमकदार होईल. तसेच, ते त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवेल.
ओट्सचा मास्क
ओट्स शरीरासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः तेलकट त्वचा असलेले लोक ओट्स वापरू शकतात. ओट्स तेलाचे उत्पादन कमी करण्यास मदत करते. हे एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. तुम्ही ओट्सचा मास्कही वापरू शकता.
साहित्य – 1 चमचा ओटमील पावडर, 2 चमचे मध
कृती – मूठभर ओट्स मिक्समध्ये बारीक करून घ्या. नंतर 1 चमचा ओटमील पावडरमध्ये 2 चमचे मध घाला. ते नीट मिक्स करावे. ज्या भागात व्हाईटहेड्स आहेत तेथे हा मास्क लावा. काही वेळ वाळल्यानंतर हा मास्क धुवून टाका. साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून केवळ 2 वेळा हा मास्क वापरा.
या गोष्टींची घ्या काळजी
– आपण नखांनी सर्व व्हाईटहेड्स काढून टाकतो. असे करू नये, त्यामुळे तुमच्या त्वचेवर डाग पडू शकतात.
– व्हाईटहेड्स काढून टाकल्यानंतर, आपल्या हातांनी त्वचेला स्पर्श करू नका. ताबडतोब हात धुवा.
– तुम्ही व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी काही साधने देखील वापरू शकता, परंतु ती स्वच्छ असल्याची खात्री करा.
– व्हाईटहेड्स काढताना त्वचेवर जास्त दबाव टाकू नका. जबरदस्तीने काढून टाकल्याने ते मुरुमांमध्ये बदलू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी वेळोवेळी त्वचा स्क्रब करत रहावे. यामुळे छिद्र बंद होणार नाहीत आणि तेलही जमा होणार नाही.