तुमच्या कपड्यांनाही येतो का घामाचा वास ? डागही जात नाहीत ? अहो, मग हे उपाय करा ना…!

अनेक प्रयत्न करूनही कपड्यांवरील घामाचे डाग आणि घामाचा वास जात नाही. पण काही हॅक्स किंवा युक्त्या आहेत ज्याद्वारे तुम्ही कपड्यांमधून घामाची दुर्गंधी सहजपणे काढून टाकू शकता.

तुमच्या कपड्यांनाही येतो का घामाचा वास ? डागही जात नाहीत ? अहो, मग हे उपाय करा ना...!
कपड्यांवरील घामाचे डाग कसे घालवाल ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 3:57 PM

Sweating Marks on clothes : शरीराला घाम येणे (Sweating) ही एक नैसर्गिक आणि सामान्य गोष्ट आहे, परंतु काहींना उन्हाळ्यात जास्त घाम येतो. अंगात घाम आल्याने घाण तर बाहेर पडते, पण त्याचा तोटाही होतो. कधी कधी अंगातून जास्त घाम आल्याने कपड्यांवर डाग ( Sweating marks )पडतात. ते डाग कधी पांढरे किंवा काळे असू शकतात. कपड्यांवरील असे डाग घालवण्यासाठी खूपच मेहनत करावी लागेत. बरेच प्रयत्न करूनही दुर्गंधीयुक्त घामाच्या खुणा सुटत नाहीत.

पण काही हॅक्स किंवा युक्त्या आहेत ज्याद्वारे तुम्ही कपड्यांमधून घामाची दुर्गंधी आणि घामाचे हट्टी डाग सहजपणे काढून टाकू शकता. तुम्हीपण या ट्रिक्स ट्राय तर करून पहा.

लिंबाचा वापर

बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत जी घामाचे डाग सहजपणे काढून टाकतात आणि त्यात लिंबाचा वापर केला जातो. डाग घालवण्यासाठी लिंबाला देसी जुगाड देखील म्हणतात. लिंबू केवळ डागच नाही तर कपड्यांमधला घामाचा वासही दूर करतो. अनेक डिटर्जंट किंवा इतर गोष्टींमध्ये लिंबाचाही समावेश होतो. घाण दूर करण्यासोबतच कपड्यांमधील सुगंधही टिकून राहतो.

बेकिंग सोडा वापरून पहा

घामाचे डाग घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचीही मदत घेऊ शकता. त्यात असे गुणधर्म असता , ज्यामुळे घामाचे डाग आणि दुर्गंध क्षणार्धात नाहीसे होऊ शकतात. जर डाग खूप चिवट असतील तर त्यावर बेकिंग सोड्याची पेस्ट लावून चांगली चोळा. थोड्या वेळाने ते पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

व्हाईट व्हिनेगर

कपड्यांवरील घामाचे डाग काढण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगरचीही मदत घेऊ शकता. यासाठी थोडे कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे पांढरे व्हिनेगर घाला. कापड थोडा वेळ भिजत ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

साबणही ठरतो उपयुक्त

बाजारात असे अनेक डिटर्जंट्स उपलब्ध आहेत जे घामाचे डाग सहज काढून टाकण्यासाठी प्रभावी आहेत. प्रथम डाग असलेले कापड हे डिटर्जंट असलेल्या पाण्यात भिजवा. थोड्या वेळाने कापड बाहेर काढा आणि त्यावर लिक्विड डिटर्जंट लावा आणि थोडावेळ असेच राहू द्या. नंतर ते मशीन मध्ये टाका किंवा किंवा हाताने स्वच्छ धुवा.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.