Herbs for Hair: केसांच्या वाढीसाठी करा ‘या’ हर्ब्सचा वापर, मिळतील सुंदर व दाट केस
केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नैसर्गिक उपायांची मदत घ्या. गळणाऱ्या व तुटणाऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काही हर्ब्सचा वापर करता येऊ शकतो.
नवी दिल्ली – आधुनिक काळात बदलती जीवनशैली, खाद्यपदार्थ आणि वातावरणामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामध्ये केस गळणे, तुटणे आणि अकाली पांढरे होणे (hair problem) यांचाही समावेश असतो. केसांच्या या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक लोक विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. तुम्हालाही केसांच्या समस्यांपासून (hair care) मुक्ती मिळवायची असेल तर महागडी उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिक उपायांचा (natural remedies) अवलंब करा. या नैसर्गिक उपायांच्या मदतीने केसांशी संबंधित समस्या कमी करता येतात.
केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरा हे हर्ब्स
केसांच्या समस्या दूर करण्यासाठी व त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करू पहा.
आवळा
केसांच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आवळ्याचा वापर करा. आवळा खाण्यापासून ते हेअर पॅक बनवण्यापर्यंत, आवळा उपयोगी ठरतो. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म केसांना निर्जीव होण्यापासून रोखू शकतात. तसेच वयाच्या आधी केस पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
मेथी दाणे
मेथी दाणे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतात. तसेच केस गळणे कमी होते. मेथी दाण्यांचा हेअर मास्क केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतो, तसेच आहारातही मेथी दाण्यांचा समावेश केल्याने केसांना फायदा मिळू शकतो. हेअर मास्क तयार करण्यासाठी मेथीचे दाणे भिजवून पेस्ट बनवा. ही पेस्ट हळूवार हाताने केसांना लावावी व थोड्या वेळाने सौम्य शांपूने केस धुवावेत. यामुळे केसांची वाढ होईल व त्यांचा पोत सुधारेल.
नारळाचे दूध
नारळाचे दूध हेही केसांसाठी खूप आरोग्यदायी ठरू शकते. नारळाच्या दुधात असलेले गुणधर्म केसांना निर्जीव होण्यापासून रोखू शकतात. यासोबतच केसांमधील आर्द्रताही राखली जाते. तुम्ही केस धुण्यासाठीही याचा वापर करू शकता. हे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते.
मेंदीची पाने
ताजी मेंदीची पाने हीदेखील केसांसाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे तुमच्या केसांचा रंग सुधारू शकतो. ती वापरण्यासाठी मेंदीची पाने स्वच्छ धुवून चांगली बारीक करून घ्या. यानंतर ती एका काळ्या पॅनमध्ये ठेवून द्यावीत. थोड्या वेळाने हा मास्क केसांना लावा. यामुळे केसांचे सौंदर्य वाढेल. तसेच तुमचे केस दाट आणि मऊ होतील.
केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही या हर्ब्सचा वापर करू शकता. मात्र कोणत्याही कारणामुळे तुमचा त्रास वाढला तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.