हिवाळ्यात घ्या केसांच्या आरोग्याची काळजी, हेअर वॉश साठी करा या गोष्टींचा वापर
थंड वाऱ्यामुळे केसांमधील आर्द्रता कमी होते, त्यामुळे केसांचा फ्रिझीनेस वाढतो. जरी केसांसाठी अनेक शांपू वापरले तरी प्रत्येक वेळेस अपेक्षित असलेला परिणाम मिळेलच याची खात्री नाही. काही नैसर्गिक उपायांच्या मदतीने तुम्ही केसांची वाढ ते केसांची चमक सर्वकाही कायम राखू शकता.
नवी दिल्ली – हिवाळ्यात कोरड्या केसांना चमक देण्यासाठी आपण अनेक प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर वापरतो. पण केसांमध्ये वाढलेला फ्रिझीनेस (frizzy) त्यांना निस्तेज बनवतो. अशा परिस्थितीत आपण केसांबाबत चिंतित होतो. केस गळणे आणि डोक्यातील कोंडा (hair fall and dandruff) यासह इतर समस्यांपासून मुक्त होण्यासाठी, आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी काही नैसर्गिक पद्धतींचा (natural ways of hair wash) समावेश करू शकता.
कडुलिंबाची पाने व कोरफडीचा रस
कडुलिंबाची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कडुलिंबाची पाने काही वेळ उकळा. ती पाने पाण्यातून काढून त्यात कोरफडीचा लगदा मिक्स करून मिक्सरमधून वाटून पेस्ट तयार करा. हे मिश्रण एका डबीत अथवा बाटलीत. केस धुवायचे असतील तेव्हा या मिश्रणात दोन चमचे कोणताही सौम्य शांपू मिसळा आणि त्याचा वापर करा. अशा प्रकारे केस धुतल्याने समस्यांपासून आराम मिळतो.
चमकदार केसांसाठी दही आणि बेसन
एका भांड्यात दही आणि बेसन समान प्रमाणात घ्या. दोन्ही पदार्थ नीट मिक्स करून पेस्ट बनवा. हे मिश्रण घट्ट झाल्यास तुम्ही त्यात थोडं पाणी घालू शकता. नंतर त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळा. जर तुम्हाला चमकदार केस हवे असतील तर हे मिश्रण केसांवर 10 ते 15 मिनिटे राहू द्या. यानंतर केस थंड पाण्याने धुवून घ्या. तुम्ही केस धुण्यासाठी सौम्य शांपूचाही वापर करू शकता.
आवळा, दही व मध
चार ते पाच आवळे धुवून घ्या. ते उकळून किसून घ्यावेत व त्याचा रस एका वाटी दह्यामध्ये मिक्स कराव. नंतर त्यात एक चमचा मध घालून मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे. आवळा, दही आणि मध यांच्या चांगल्या गुणांनी समृद्ध असलेले हे मिश्रण केसांना उत्तम पोषण प्रदान करते. हे द्रावण तुम्ही स्काल्प व केसांवर नीट लावा. हे मिश्रण केसांवर 5 मिनिटे राहू द्यावे व नंतर केस धुवा. यामुळे केसांच्या कोरडेपणाची समस्या दूर होईल.
मुलतानी माती आणि दही
एका भांड्यात अर्धी वाटी मुलतानी माती घ्या. त्यात समान प्रमाणात दही मिसळा. आता हे दोन्ही पदार्थ नीट मिक्स करा. त्यामध्ये शिकेकाईच्या चार कळ्या बारीक करून घाला. हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा त्यामुळे ते नीट मिक्स होते व त्यातील गुणधर्मही वाढतात. सकाळी हा पॅक केसांना लावा व थोड्या वेळाने सौम्य शांपून केस धुवा.
आवळा व शिकेकाईच्या कळ्यांचा पॅक
वाळलेले काळे आवळे लोखंडी कढईत पाण्यात भिजवा. नंतर त्यात शिकेकाईच्या दोन कळ्या टाका. लोखंडी कढईमध्ये अनेक फायदे दडलेले आहेत. नंतर आवळा व शिकेाईच्या कळ्या नीट मिक्स करा आणि जाडसर चाळणीतून गाळून घ्या. दाट केसांसाठी यामध्ये दोन चमचे हर्बल शांपू मिसळा व त्याचा केसांसाठी वापर करा.