Mustard Oil Benefits: पायांच्या भेगांपासून ते सर्दीपर्यंत, थंडीत सर्व समस्यांवर गुणकारी मोहरीचे तेल

मोहरीचे तेल सेवन करण्याचे तसेच ते लावण्याचेही अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यातही याचा वापर फायदेशीर ठरतो.

Mustard Oil Benefits: पायांच्या भेगांपासून ते सर्दीपर्यंत, थंडीत सर्व समस्यांवर गुणकारी मोहरीचे तेल
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 5:44 PM

नवी दिल्ली – मोहरीच्या तेलाचा (mustard oil) आजही बरेच लोक वापर करतात. स्वयंपाकापासून ते शरीराला मसाज करण्यापर्यंत आजही मोहरीचे तेल अनेक लोकांची पहिली पसंती आहे. पूर्वीच्या काळी लहान मुलांना मसाज (small kids) करण्यासाठीही मोहरीचे तेल वापरले जायचे. या तेलाच्या अगणित फायद्यांमुळे, लोक त्याचा सतत वापर करतात. पण बदलत्या काळानुसार लोकांच्या सवयींमध्ये खूप बदल झाले आहेत. आजकाल ऑलिव्ह ऑईल आणि रिफाइंड ऑइलमुळे लोक मोहरीच्या तेलाचा वापर कमी करत आहेत. मोहरीचे तेल लावण्याचे फायदे (benefits of mustard oil) जाणून घेऊया.

केसगळतीवर ठरते फायदेशीर

हिवाळ्यात मोहरीचे तेल वापरणे हे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुमचे केस कोरडे, निस्तेज होऊन गळत असतील तर मोहरीचे तेल तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामध्ये असलेली प्रथिने आणि ओमेगा-3 अनसॅच्युरेटेड फॅट्स हे केसांची वाढ आणि पोषण यात महत्वपूर्ण ठरतात. मोहरीचे तेल खोबरेल तेलात मिसळून लावल्यास फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

रक्ताभिसरण सुधारण्यासाठी फायदेशीर

शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मसाज हा एक उत्तम पर्याय आहे. मसाज केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. पण मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास दुहेरी फायदा होतो. हिवाळ्यात मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.

शरीर उबदार राहते

हिवाळा आला की लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय करतात. तुम्ही सर्दी टाळण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग शोधत असाल तर मोहरीचे तेल हा उत्तम पर्याय ठरेल. त्यासाठी अंघोळीनंतर मॉयश्चरायझर ऐवजी मोहरीचे तेल लावावे. कोमट तेल लावल्याने शरीर आतून उबदार राहते.

टाचेला भेगा पडणे

हिवाळा येताच, टाचांना भेगा पडणे आणि त्वचा कोरडी होणे, या समस्येने लोक त्रस्त होतात. अशा परिस्थितीत मोहरीच्या तेलाचा वापर खूप फायदेशीर ठरतो. मोहरीचे तेल हे व्हिटॅमिन बी ने समृद्ध असते, त्याच्या वापराने त्वचा चमकदार आणि निरोगी बनते. यासोबतच ते लावल्याने टाचांना भेगा पडण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

सर्दी-खोकल्यापासून मिळतो आराम

हिवाळ्यात आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते, त्यामुळे बऱ्याच लोकांना सर्दी- खोकला व ताप येतो व त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी मोहरीच्या तेलाचा वापर केल्यास या समस्येपासून आराम मिळतो. त्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स तुम्हाला सर्दी आणि तापापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.