Vacation Destination | नव्या वर्षात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तुमच्या जवळची ही ठिकाणं नक्की बघा!

कोरोनाची लस शोधण्यात यश आल्याने आता लोक घराबाहेर पडण्यास सुरुवात करत आहेत. पूर्णपणे ठप्प झालेले पर्यटन क्षेत्र आता काहीसे भरारी घेऊ लागले आहे.

Vacation Destination | नव्या वर्षात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तुमच्या जवळची ही ठिकाणं नक्की बघा!
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 11:22 AM

मुंबई : नव्या वर्षाचे आगमन झाले आहे. कोरोनामुळे 2020 हे वर्ष पूर्णपणे बंदिस्त वातावरणात गेलं आहे. यामुळेच आता, 2021 कडून लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. कोरोनाची लस शोधण्यात यश आल्याने आता लोक घराबाहेर पडण्यास सुरुवात करत आहेत. पूर्णपणे ठप्प झालेले पर्यटन क्षेत्र आता काहीसे भरारी घेऊ लागले आहे. नवीन वर्षात लोक सुट्ट्यांचे नियोजन करत आहेत. अद्याप कोरोनाची धास्ती असल्याने त्यातल्या त्यात जवळच्या ठिकाणांना भेट देण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अशातच तुम्ही देखील या नव्या वर्षाचा मुहूर्त साधून फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आम्ही तुमचा थोडा भार हलका करणार आहोत. जवळची काही पर्यटनस्थळे आणि त्यांची माहिती वाचून तुम्ही तुमच्या सहलीचे नियोजन करू शकाल…(Vacation Destination for new year)

लोणावळा-खंडाळा :

पुणे – मुंबई महामार्गावर लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे असलेली विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरले डोंगरमाथे व दर्‍या हे सारं काही मनाला खूप शांती देणारं आहे. वर्षाच्या अगदी कुठल्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपास पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉईंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. अगदी एक किंवा दोन दिवसांचा वेळ काढून तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.

अलिबाग :

मुंबईपासून अवघ्या 110 किलोमीटरवर असणारं हे शहर पर्यटकांचे अतिशय आवडते ठिकाण आहे. अलिबाग बसस्थानकापासून साधारण 1 किमी पश्चिमेला चार ते पाच किलोमीटर लांबीचा वालुकाम समुद्रकिनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर तसेच प्रदूषणमुक्त किनारा म्हणून अलिबागचा किनारा ओळखला जात असला, तरी अलीकडे हातगाडीवाल्यांची गर्दी येथील शांतता भंग करते. अलिबागमधील कुलाबा किल्लादेखील प्रसिद्ध आहे. ओहोटी आल्यानंतर किल्ल्यात चालत जाता येते. भरतीच्या वेळेस किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद होतो. याशिवाय किनाऱ्यावर असणारे वॉटर स्पोर्ट्स देखील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

बामणोली :

भोरपासून सातारा आणि तेथून बामणोली अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर आहे. काही अंतर पुढे गेल्यावर सातारा शहर लागते. तिथेच दक्षिणेला सज्जनगड दिसतो. वाटेत पुढे दहा किमी अंतरावर कन्हेर व उमरेडी ही दोन धरणे दिसतात. काही अंतर पुढे जाताच कास तलाव दिसतो. निसर्गाची देणगी लाभलेला हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे. या कास तलावाचे वैशिष्ट्‍य असे, की त्याचे पाणी उन्हाळ्यातही कमी होत नाही. कास तलावानंतर पुढे बामणोली जाता येते. डोंगरातील वळणावळणाच्या रस्त्यामुळे इथले वातावरण सुखावह झालेले असते. इथे जवळच अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत (Vacation Destination for new year).

इगतपुरी :

मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे तालुक्याचे गाव आहे. इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे. या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. इथे मुक्काम करून आजूबाजूला पाहण्यासारख्या जागा म्हणजे अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, खोडाळा, सुंदरनारायण गणेश मंदिर याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांदण दरी, रंधा धबधबा या ठिकाणपासून जवळच आहेत. तसेच इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विपश्यना केंद्र आहे. साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून, परदेशांतूनही अनेक लोक येथे येतात.

भीमाशंकर :

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असून हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण असून भिमा नदीचे उगमस्थानही इथेच आहे. इथल्या अभयारण्यात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी देखील पाहायला मिळतात. ‘उडणारी खार’ हा दुर्मिळ प्राणी फक्त या जंगलातच पाहायला मिळतो. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी ही ठिकाणे देखील पाहण्यासारखी आहेत.

(Vacation Destination for new year)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.