Vacation | ‘द्राक्षांच्या शहरात’ घ्या सुट्ट्यांचा आनंद, नाशिकमधील आवर्जून भेट देण्यासारखी प्रसिद्ध ठिकाणे…
मुंबईपासून जवळच असलेलं 'नाशिक’ हे शहरदेखील पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे.
मुंबई : एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्याशिवाय सुट्ट्यांचे उद्दिष्ट पूर्ण होऊच शकत नाही, सध्या सुट्ट्यांचा मोसम सुरु आहे. कोरोनाची भीती असली तरी लोक जवळ का होईना पण फिरायला जाण्याचे नियोजन करत आहे. मुंबईपासून जवळच असलेलं ‘नाशिक’ हे शहरदेखील पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजेच महादेव ‘त्र्यंबकेश्वर’ मंदिर नाशिकमध्ये स्थित आहे (Vacation Trip In Nashik must visit these place).
नाशिकचा इतिहास
भरपूर द्राक्षाच्या उत्पादनामुळे ‘द्राक्षांचे शहर’ म्हणून हे शहर ओळखले जाते. नाशिक मुंबईपासून 180 किमी दूर आणि पुण्यापासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे. नापा व्हॅलीच्या पश्चिमी घाटावर वसलेले हे शहर आहे. नाशिकच्या पूर्वेला सातवाहन राजवंशाची राजधानी होती. 16व्या शतकात हे शहर मुगलांच्या ताब्यात होते. त्यावेळी या शहराला ‘गुलशननाबाद’ असे म्हटले जाते होते. असे म्हटले जाते की, 14 वर्ष वनवासाच्या काळात, भगवान श्रीरामांनी नाशिकजवळील तपोवन नावाच्या एका ठिकाणी वास्तव्य केले होते. याच ठिकाणावर, लक्ष्मणाने एका शूर्पणखाचे नाक कापले होते आणि म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले.
सिक्का संग्रहालय
सिक्का संग्रहालय नाशिकमधील एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. 1980मध्ये भारतीय न्यूमिज़माटिक स्टडीज (IIRNS) रिसर्च इन्स्टिट्यूटने सुरु केलेले हे आशियातील एकमेव संग्रहालय आहे. अंजनेरीच्या सुंदर टेकड्यांवर सिक्का संग्रहालय वसलेले आहे. या संग्रहालयात लेख, छायाचित्रे, वास्तविक आणि पुनरावृत्तीच्या नाण्यांमधील वेळोवेळी होणारे भारतातील चलन प्रणालीतील बदल याबद्दलची माहिती उपलब्ध आहे. संग्रहालयाद्वारे नाणी गोळा करण्यात इच्छुक असलेल्यांसाठी कार्यशाळादेखील आयोजित केल्या जातात.
सुला वाईनयार्ड
सुला नाशिमधिल एक प्रसिद्ध वाईन गार्डन आहे. नागपूर जसे संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच नाशिक द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराचे हवामान द्राक्ष लागवडसाठी अगदी योग्य आहे. सुला वाईनयार्ड हे भारतातील सर्वोत्कृष्ट वाइनरी उत्पादन केंद्र आहे. या वाईनयार्डमध्ये एक वाईन टेस्टिंग रूम देखील आहे. जिथे पर्यटकांना विविध प्रकारच्या वाईन चाखण्याची संधी मिळते, ज्यात केवळ 100 रुपये इतकाच खर्च होतो (Vacation Trip In Nashik must visit these place).
कुंभमेळा
कुंभमेळा हा एक प्राचीन लोकप्रिय उत्सव आहे. जो अनेक वर्षांसापासून साजरा केला जात आहे. येथे जगातील सर्वात मोठी धार्मिक जत्रा भरते. आता तर नाशिक पर्यटन विभागतर्फे देखील या महोत्सवाची जाहिरात केली जात आहे. हळूहळू नाशिकमधील या मेळ्याचे आकर्षण वाढत आहे. बारा वर्षांत चार वेळा या कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या वेळेस लाखो भाविक नाशिक, उज्जैन, अलाहाबाद आणि हरिद्वार येथून नाशिकमध्ये येतात.
पांडवलेणी
नाशिकमधील पांडवलेणी देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू आहेत. त्रिशमा पठारावर वसलेल्या या पांडवलेणी जवळपास 2500 वर्षांपेक्षा जुन्या आहेत.पेक्षा जास्त वर्षे जुनी आहेत. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी 2000 वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. येथे एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या, पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत.
त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर भारतातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. ‘त्र्यंबकेश्वर’ महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, जर एखाद्या व्यक्तीने त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले तर त्याला मोक्ष मिळतो, असे म्हटले जाते. इथे भेट देणाऱ्या भाविकांसाठी विश्रामगृहांची व्यवस्था देखील उपलब्ध आहे.
(Vacation Trip In Nashik must visit these place)
हेही वाचा :
Weekend Trip | विकेंडसाठी लोणावळ्याला जाताय? ‘या’ ठिकाणांना आवर्जून भेट द्या!https://t.co/f4GdJDYrTo#WeekendTrip #Lonavala
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2020