Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chocolate Day 2021 | होममेड चॉकलेट देऊन वाढवा प्रेमातला गोडवा, वाचा याची रेसिपी…

फेब्रुवारी महिन्यात येणारा ‘व्हॅलेंटाईन वीक’ (Valentines week 2021) हा सगळ्याच जोडप्यांसाठी खूप खास असतो. हा संपूर्ण आठवडा दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो.

Chocolate Day 2021 | होममेड चॉकलेट देऊन वाढवा प्रेमातला गोडवा, वाचा याची रेसिपी...
चॉकलेट डे
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 12:09 PM

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात येणारा ‘व्हॅलेंटाईन वीक’ (Valentines week 2021) हा सगळ्याच जोडप्यांसाठी खूप खास असतो. हा संपूर्ण आठवडा दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. या आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी ‘चॉकलेट डे’ (Chocolate Day 2021) साजरा केला जातो. या दिवशी ते भेटवस्तू म्हणून एकमेकांना चॉकलेट्स देतात. परंतु, या वर्षी व्हॅलेंटाईन वीकमधला ‘चॉकलेट डे 2021’ आपल्याला खास शैलीत साजरा करायचा असेल, तर आपण स्वतःच्या हाताने चॉकलेट्स बनवून ते आवडत्या व्यक्तीस भेट म्हणून देऊ शकता. आपली ही खास शैली आपल्या जोडीदाराला देखील खूप इम्प्रेस करेल, आणि हा दिवस ते नेहमी लक्षात ठेवतील. तुम्ही देखील घरच्या घरी चॉकलेट बनवण्याचा विचार करत असाल, तर ते कसे बनवता येईल ते जाणून घेऊया…(Valentines week Chocolate Day 2021 special homemade chocolate recipe)

चॉकलेटसाठी लागणारे साहित्य :

– एक वाटी पिठी साखर

– नारळ तेल किंवा कोकाआ बटर पाऊण कप

– 1 चमचे व्हॅनिला इसेन्स

– पाव कप दुधाची पावडर

– पाऊण कप कोको पावडर

(Valentines week Chocolate Day 2021 special homemade chocolate recipe)

होममेड चॉकलेट कृती :

सर्वप्रथम गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यावर एक मोठा वाडगा ठेवा, मग त्यात नारळ तेल किंवा कोकाआ बटर घाला. नंतर त्यात साखर, कोको पावडर आणि दुधाची भुकटी घाला. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. जेव्हा ते गुळगुळीत आणि एकधारी दिसू लागतील, तेव्हा आपल्या आवडत्या डिझाइनच्या सिलिकॉन मोल्डमध्ये हे मिश्रण भरा. यासाठी बर्फाचा साचा देखील वापरु शकता. चॉकलेट सेट करण्यासाठी मोल्ड हलक्या हाताने हलवा. यानंतर, तो दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. सेट झाल्यानंतर प्लेटमध्ये एक एक करून चॉकलेट बाहेर काढा. व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी, तळापासून हलका दाब देऊन चॉकलेट पुढे ढकला. नंतर त्यावर थोडाशी पिठी साखर भूरभुरा. झाले तुमचे होममेड चॉकलेट तयार! आता हे चॉकलेट्स एका छान बॉक्समध्ये पॅक करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीस भेट म्हणून द्या.

लक्षात ठेवा!

होममेड चॉकलेट मिश्रण बनवण्यासाठी नेहमीच मोठा वाडगा वापरा जेणेकरून ते चांगले मॅश होऊ शकेल. तसेच, बाहेरच्या भांड्यातील पाणी मिश्रणाच्या वाडग्यात अजिबात जाऊ नये. तसेच, जेव्हा आपण चॉकलेट मोल्डमधून बाहेर काढता, तेव्हा काळजीपूर्वक काढा, जेणेकरुन चॉकलेटचा आकार खराब होणार नाही आणि ते तुटणार देखील नाहीत.

(Valentines week Chocolate Day 2021 special homemade chocolate recipe)

हेही वाचा :

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.