मुंबई : फेब्रुवारी महिन्यात येणारा ‘व्हॅलेंटाईन वीक’ (Valentines week 2021) हा सगळ्याच जोडप्यांसाठी खूप खास असतो. हा संपूर्ण आठवडा दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. या आठवड्याच्या तिसर्या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी ‘चॉकलेट डे’ (Chocolate Day 2021) साजरा केला जातो. या दिवशी ते भेटवस्तू म्हणून एकमेकांना चॉकलेट्स देतात. परंतु, या वर्षी व्हॅलेंटाईन वीकमधला ‘चॉकलेट डे 2021’ आपल्याला खास शैलीत साजरा करायचा असेल, तर आपण स्वतःच्या हाताने चॉकलेट्स बनवून ते आवडत्या व्यक्तीस भेट म्हणून देऊ शकता. आपली ही खास शैली आपल्या जोडीदाराला देखील खूप इम्प्रेस करेल, आणि हा दिवस ते नेहमी लक्षात ठेवतील. तुम्ही देखील घरच्या घरी चॉकलेट बनवण्याचा विचार करत असाल, तर ते कसे बनवता येईल ते जाणून घेऊया…(Valentines week Chocolate Day 2021 special homemade chocolate recipe)
– एक वाटी पिठी साखर
– नारळ तेल किंवा कोकाआ बटर पाऊण कप
– 1 चमचे व्हॅनिला इसेन्स
– पाव कप दुधाची पावडर
– पाऊण कप कोको पावडर
(Valentines week Chocolate Day 2021 special homemade chocolate recipe)
सर्वप्रथम गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यावर एक मोठा वाडगा ठेवा, मग त्यात नारळ तेल किंवा कोकाआ बटर घाला. नंतर त्यात साखर, कोको पावडर आणि दुधाची भुकटी घाला. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. जेव्हा ते गुळगुळीत आणि एकधारी दिसू लागतील, तेव्हा आपल्या आवडत्या डिझाइनच्या सिलिकॉन मोल्डमध्ये हे मिश्रण भरा. यासाठी बर्फाचा साचा देखील वापरु शकता. चॉकलेट सेट करण्यासाठी मोल्ड हलक्या हाताने हलवा. यानंतर, तो दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. सेट झाल्यानंतर प्लेटमध्ये एक एक करून चॉकलेट बाहेर काढा. व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी, तळापासून हलका दाब देऊन चॉकलेट पुढे ढकला. नंतर त्यावर थोडाशी पिठी साखर भूरभुरा. झाले तुमचे होममेड चॉकलेट तयार! आता हे चॉकलेट्स एका छान बॉक्समध्ये पॅक करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीस भेट म्हणून द्या.
होममेड चॉकलेट मिश्रण बनवण्यासाठी नेहमीच मोठा वाडगा वापरा जेणेकरून ते चांगले मॅश होऊ शकेल. तसेच, बाहेरच्या भांड्यातील पाणी मिश्रणाच्या वाडग्यात अजिबात जाऊ नये. तसेच, जेव्हा आपण चॉकलेट मोल्डमधून बाहेर काढता, तेव्हा काळजीपूर्वक काढा, जेणेकरुन चॉकलेटचा आकार खराब होणार नाही आणि ते तुटणार देखील नाहीत.
(Valentines week Chocolate Day 2021 special homemade chocolate recipe)
Chocolate Day 2021 | बॉलिवूडकर म्हणतात ‘चॉकलेटसाठी काहीही…’, फिटनेसच्या बाबतीतही तडजोडीला तयार!#chocolateday | #ChocolateDay2021 | #ValentineWeek2021 https://t.co/3c0xkB7SNb
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021