Hug Day 2021 | आनंदच नव्हे तर, आरोग्यदायीही ‘जादू की झप्पी’, वाचा याचे फायदे…

व्हॅलेंटाईन वीकमधला सहावा दिवस अर्थात 12 फेब्रुवारी ‘हग डे’ अर्थात ‘मिठी मारण्याचा दिवस’ म्हणून साजरा करतात. मिठी मारून तुम्ही केवळ तुमची नाराजी दूर करत नाही, तर आरोग्यासाठीही हग करणे खूप फायदेशीर आहे.

Hug Day 2021 | आनंदच नव्हे तर, आरोग्यदायीही ‘जादू की झप्पी’, वाचा याचे फायदे...
हग डे 2021
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 2:36 PM

मुंबई : असे म्हणतात की, कोणताही संबंध परिपूर्ण नसतो. वाद, भांडणे, तक्रारी आणि असंतोष प्रत्येक नात्यात एकत्र येत असतात. परंतु, असे काही दिवस असतात जे या गोष्टी विसरायला लावतात आणि वातावरण तसेच आपले नातेसंबंध आनंदी करतात. अशा दिवसांना आपण एकमेकांच्या तक्रारी दूर करण्याचे निमित्त म्हणूनही विचारात घेऊ शकता. व्हॅलेंटाईन वीकमध्ये अनेक लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करत असतात. व्हॅलेंटाईन वीकमधला सहावा दिवस अर्थात 12 फेब्रुवारी ‘हग डे’ अर्थात ‘मिठी मारण्याचा दिवस’ म्हणून साजरा करतात. मिठी मारून तुम्ही केवळ तुमची नाराजी दूर करत नाही, तर आरोग्यासाठीही हग करणे खूप फायदेशीर आहे (Valentines week Hug Day 2021 special health benefits of hug).

एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर आनंदाच्या भरात लगेचच आलिंगन दिले जाते. अर्थात मिठी मारली जाते. आनंद, दु:ख किंवा अशाच कोणत्याही भावनेला व्यक्त करण्यासाठी आपल्या मनाच्या जवळ असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हमखास मिठी मारली जाते. अगदी सहजपणे मारली जाणारी ही मिठी, म्हणजे जणू अनेकदा आपली तारणहारही ठरते. पण, तुम्हाला माहितीये का? याच मिठीचे काही महत्त्वपूर्ण फायदेही आहेत. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून किमान चार वेळा मिठी मारणे अतिशय लाभदायी ठरु शकते.

तणाव कमी होतो.

मिठी मारणे हॅपी हार्मोन ऑक्सीटॉसिनच्या वाढीस कारणीभूत ठरते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाची गती सामान्य होते. यामुळे व्यक्तीचा मूड बदलतो आणि तणावानंतरच्या तक्रारी दूर करण्यात मदत होते.

आजारांपासून बचाव होतो.

ताणतणावामुळे आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तणाव कमी केल्याने बर्‍याच प्रकारचे आजार टाळता येतात. ज्यांना आपल्या प्रियजनांकडून जास्त ‘जादू की झप्पी’ मिळते त्यांना अधिक मानसिक आधार मिळतो आणि त्यांना आजार होण्याची शक्यता देखील कमी असते. त्याच वेळी, आजारी असताना, हा आधार लवकर बरे होण्यासाठी देखील मदत करतो (Valentines week Hug Day 2021 special health benefits of hug).

प्रेम आणि विश्वास वाढतो.

जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो तेव्हा आपल्या शरीरातून बरेच हार्मोन्स बाहेर पडतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. असे केल्याने आपण प्रेम व्यक्त करतो, आपला प्रेम आणि विश्वास पूर्वीपेक्षा अधिक वाढतो. त्यातून आनंदही मिळतो. ताणतणाव कमी होतो प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना आधार देणे प्रेमास अधिक बळकट करते.

दु:खाशी लढण्याची क्षमता वाढते.

जेव्हा जीवनात दुःखाचे क्षण असतात, तेव्हा जोडीदाराची सर्वात जास्त आवश्यकता असते. त्याच्या एका मिठीमुळे दु:खाशी लढण्याची क्षमता वाढते. आयुष्यातील समस्यांमुळे ताणतणाव येणे देखील अशावेळी कमी होते. तणाव कमी करून अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. प्रत्येक परिस्थितीत एकमेकांशी असण्याचा अर्थ म्हणजे ‘मिठी’ आहे.

(Valentines week Hug Day 2021 special health benefits of hug)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.