Vastu Tips | स्वप्नातलं टुमदार घर बांधताय? जाणून घ्या कुठली जमीन ठरेल शुभ…
घराची जमीन विकत घेण्यापूर्वी, लोक आजूबाजूची जागा, तिथले लोक आणि इतर गोष्टीं काळजीपूर्वक लक्षात घेतात.
मुंबई : प्रत्येकाला एक ना एक दिवस त्यांच्या स्वप्नातले घर विकत घ्यायचे असते किंवा ते बांधायचे असते. घराची जमीन विकत घेण्यापूर्वी, लोक आजूबाजूची जागा, तिथले लोक आणि इतर गोष्टीं काळजीपूर्वक लक्षात घेतात. याशिवाय वास्तुशास्त्रात घर बांधण्यापूर्वी जामिनाचा पोत आणि वातावरणाचा आढावा घेणे योग्य मानले जाते. असे केल्याने आपण भविष्यात घराच्या वास्तू दोशामुळे होणारे त्रास टाळू शकता (Vastu Tip for building new home).
वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार जमीन आपल्यासाठी शुभ आहे की नाही, हे प्रथम तपासून पाहणे आवश्यक आहे. ती जमीन कशी आहे, कोणत्या दिशेने जमिनीवर घर बांधणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते, हजे देखील तपासले पाहिजे. चला तर, वास्तुशास्त्रानुसार घर बांधण्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन विकत घ्यावी, ते जाणून घेऊया…
घर बांधताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्या :
– तुमच्या जमिनीत बांधकाम करण्यापूर्वी खोदताना जर हाडे, क्रॅनियम, कोळसा आढळल्यास ती जमीन शुभ मानली जात नाही. या ऐवजी जर तुम्हाला त्या ठिकाणी नाणी, वीट, दगड इत्यादी वस्तू मिळाल्या, तर ही जमीन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुखकारक आणि समृद्ध करेल.
– जर मातीचा रंग लाल असेल, तर तो कोणत्याही व्यवसायासाठी खूप चांगला मानला जातो. याशिवाय जर मातीचा रंग काळा असेल तर त्त्या जमिनीवर घर बांधणे अतिशय शुभ आहे.
– तसेच, भूखंड खरेदी करताना हे तपासून घ्या की, जमिनीभोवती कोणतीही जुनी विहीर आणि भग्नावशेष नसावेत.
– एखाद्या जमिनीवर घर बांधताना मुख्य गेटच्या दिशेने लक्ष देणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर किंवा पूर्वेकडे वास्तूचे तोंड करणे शुभ मानले जाते. याशिवाय घराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेने नसावे (Vastu Tip for building new home).
– जर जमिनीवर झाडे असतील, तर त्या जागेवर घर बांधू नये.
– आपल्या घराच्या दक्षिण दिशेला गटार, हातपंप, पाण्याची टाकी असता कामा नये.
– वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर सावली पडता कामा नये. त्यामुळे दरवाजाच्या अगदी समोर एखादे झाड किंवा खांब असणार नाही, याची काळजी घ्या. तसेच दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या असल्यास त्यांची संख्या विषम असावी. घराच्या दरवाजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तरही महत्त्वाचे असते. समजा तुमच्या दरवाजाची उंची 10 फूट असेल तर त्याची रुंदी पाच फूट असायला हवी.
– ईशान्य भागाकडील या प्रभागात देवघर असावे. या भागात अभ्यास, वाचन, मनन, चिंतन, प्राणायाम, ध्यानधारणा इ. अवश्य करावी. देवघर येथे घेणे शक्य नसेल तर निदान जपजाप्य, पोथीवाचन, ध्यान इ.गोष्टींसाठी येथे यावे.
– घरातील आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असणे सर्वाधिक शुभ मानले जाते. आग्नेयेमध्ये स्वयंपाकघराशिवाय लहान मुलांची झोपण्याची व्यवस्था करणे हे त्यांच्या शरीरसंपदा व बौद्धिक संपदा वाढविण्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरते. तसेच शारीरिक व्यायामासाठीही हा भाग चांगला असतो.
(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)
(Vastu Tip for building new home)
हेही वाचा :
Vaastu Tips : अपत्यसुखासाठी प्रयत्न करताय? तर वास्तुशास्तानुसार या दिशेला असावं बेडरुमhttps://t.co/ESW6qAHh1G#vastutips #bedroomdecor
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2021