बॅचलर तरुण-तरुणींनी बेडरूममध्ये ‘या’ गोष्टी चुकूनही ठेवू नयेत, नाही तर..

वास्तुशास्त्रानुसार, अविवाहित तरुण-तरुणींनी आपल्या बेडरूममध्ये काही विशिष्ट वस्तू ठेवणे टाळावे. वाहणारे पाणी दाखवणारी चित्रं, बेडखाली लोखंडी वस्तू, बीम असलेले छत, आणि चुकीच्या दिशेने झोपणे यांमुळे विवाहात अडचणी येऊ शकतात. उत्तर-पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपणे आणि सकारात्मक चित्रांचा वापर करणे शुभ मानले जाते. या टिप्सचा अवलंब करून तुमच्या लग्नातील अडथळे दूर करा.

बॅचलर तरुण-तरुणींनी बेडरूममध्ये 'या' गोष्टी चुकूनही ठेवू नयेत, नाही तर..
रूममध्ये या गोष्टी ठेवू नका
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 2:37 PM

वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या जातात. शुभ आणि अशुभ फलाच्या अनुषंगाने या गोष्टी सांगितल्या जातात. घर कसं सजवलं पाहिजे, घरात कोणत्या गोष्टी असाव्यात, कोणत्या दिशेला काय असावं यासह वास्तू दोषाच्या गोष्टीही सांगितल्या जातात आणि त्यावरील उपायही सांगितले जातात. घरातील वाद विवाद, लग्नात येणाऱ्या बाधा, आरोग्याबाबतच्या समस्या, पती-पत्नीतील कलह आदी गोष्टींवर वास्तुशास्त्र उपाय सांगत असतो. कुणाचं लग्न लवकर का होत नाही यावरही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच अविवाहितांना घरातील बेडरूममध्ये काही गोष्टी ठेवण्यास मना करण्यात आल्या आहेत. अशा गोष्टींमुळे लग्नात बाधा येत असते. तुमच्या लग्नात बाधा येणाऱ्या कोणत्या वस्तू हटवल्या पाहिजे याची माहिती वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे. तेच आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

वास्तुनुसार फोटो निवडा

तरुण-तरुणी त्यांच्या बेडरूमच्या सजावटीसाठी बेडरूममध्ये आकर्षक चित्रे लावतात. वाहणारे पाणी, धबधबा, नदी यांची चित्रे, आदी चित्रे घराच्या भिंतीवर लावली जातात. पण वास्तुच्या दृष्टीने हे फोटो विवाहामध्ये अडचणी आणू शकतात. त्यामुळे या चित्रांना हटवून त्याऐवजी पक्षी किंवा सुंदर फुलांची चित्रे लावू शकता.

बेडच्या खाली लोखंडी वस्तू नको

लग्न करू इच्छिणाऱ्यांनी नेहमीच्या गादीच्या बेडवर झोपू नये. बेडच्या खाली लोखंडी वस्तू ठेवल्यास ते अशुभ ठरू शकतात. तसेच, बेडच्या समोर जर बाथरूमचा दरवाजा उघडत असेल तर तो बंद ठेवा, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होऊ शकते आणि विवाहामध्ये अडचण येऊ शकते.

या छताखाली झोपू नका

वास्तुच्या अनुसार, अविवाहित तरुण किंवा तरुणींनी ज्या रूमच्या छतावर बीम किंवा पिलर आहे, त्या रूममध्ये झोपू नये. अशा रूममध्ये झोपणे अशुभ मानले जाते. विवाहयोग्य व्यक्तींच्या बेडरूममध्ये छत दोन भागांमध्ये विभागलेले नसावे, कारण यामुळे विवाहामध्ये अडचण येऊ शकते. जर तुमच्या रुममध्ये असे असेल तर ते बदलायला हवं.

झोपण्याच्या दिशेत बदल करा

जर तुम्ही जीवनसाथीच्या शोधात असाल, तर दक्षिण दिशेने डोकं ठेऊन झोपू नका. अविवाहित लोकांनी उत्तर पश्चिम दिशेने डोकं ठेऊन झोपावं. चुकीची दिशा विवाहामध्ये अडचणी निर्माण करू शकते. तसेच, बेडचा टोक दीवार किंवा खिडकीला चिकटलेला नसावा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...