Vitamin Deficiency : जीभ ‘अशी’ दिसत असेल तर समजा शरीरात आहे ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वृद्ध नागरिकांसह तरूण पिढीमध्येही व्हिटॅमिन बी ची कमतरता असल्याचे आढळून येते. जाणून घेऊया काय आहेत लक्षणे..

Vitamin Deficiency : जीभ 'अशी' दिसत असेल तर समजा शरीरात आहे 'या' व्हिटॅमिनची कमतरता
Vitamin Deficiency : जीभ 'अशी' दिसत असेल तर समजा शरीरात आहे 'या' व्हिटॅमिनची कमतरताImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 10:41 AM

व्हिटॅमिन म्हणजेच जीवनसत्वे ही ऑर्गॅनिक कंपाऊंड ( सेंद्रिय संयुगे) आहेत, ज्याची लोकांना खूप कमी प्रमाणात आवश्यकता असते. आपल्या शरीरात व्हिटॅमिनचे (Vitamin) उत्पादन नगण्य असते. त्यामुळे आपल्याला अन्नातून त्याची कमतरता पूर्ण करावी लागते. निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची गरज असते. हे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरात वेगवेगळी कार्य निभावतात. मात्र शरीरातील व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे (Deficiency) अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बऱ्याच वेळेस शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, हे ओळखणे फार कठीण होते, कारण त्याची लक्षणे उशीरा दिसू लागतात. वेळेवर त्याबद्दल न कळल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शरीरात होणाऱ्या छोट्या-छोट्या बदलांकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. सर्व जीवनसत्वांप्रमाणेच व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B 12) हेही शरीरासाठी फार उपयोगी आणि महत्वपूर्ण मानले जाते.

हे व्हिटॅमिन लाल रक्त पेशी ( Red Blood Cells) आणि डीएनएच्या (DNA) निर्मितीसाठी गरजेचे असते. त्याशिवाय मेंदू आणि मज्जातंतूच्या विकासातही व्हिटॅमिन वी 12 महत्वपूर्ण भूमिका निभावते. मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते. शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित आजार, वंध्यत्व, थकवा, स्नायूंमध्ये अशक्तपणा आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास त्याची लक्षणे जीभेवरही दिसून येतात.

काय आहेत व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे :

हेल्थ वेबसाइट वेबमेडच्या सांगण्यानुसार, शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास लोकांना जीभेवर अल्सरचा त्रास होतो. तोंडात, हिरड्यांमध्ये किंव जीभेवर अल्सर येतात. साधारणत: जीभेवरील अल्सरचे व्रण आपोआप ठीक होतात. मात्र त्यामुळे होणाऱ्या वेदना आणि जळजळ यापासून वाचायचे असेल तर अति तिख्ट आणि आंबट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. या अल्सर्ससाठी बाजारात अनेक औषधे मिळतात, जी लावल्यावर तुम्हाला आराम मिळू शकतो.

हे सुद्धा वाचा

वेबमेडच्या माहितीनुसार, जीभेवर जखम किंवा व्रण होण्यासोबतच जीभ अतिशय गुळगुळीत होणे, हेही व्हिटॅमिन 12 बीच्या कमतरतेचे एक लक्षण आहे. जिभेमध्ये असलेल्या लहान लहान ग्रॅन्युल्सला पॅपिला असे म्हणतात. परंतु, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असते तेव्हा हे दाणे पूर्णपणे नाहीसे होतात. आणि जीभ अतिशय स्मूथ किंवा गुळगुळीत होते. मात्र त्याचे कारण केवळ व्हिटॅमिन बी 12 च कमतरताच नव्हे तर एखादे इन्फेक्शनही असून शकते.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे संकेत :

– शरीरात ताकद नसणे.

– स्नायूंमध्ये अशक्तपणा वाटणे.

– स्पष्ट न दिसणे किंवा धूसर दिसणे.

– डिप्रेशन किंवा कन्फ्यूजन सारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागणे.

– स्मरणशक्ती कमी होणे, एखादी गोष्ट समजण्यात अडचण निर्माण होणे

– शरीराला मुंग्या येणे

या पदार्थांमध्ये असते मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 :

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार (NHS) 19 ते 64 वयोगटातील लोकांना रोज 1.5 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी 12 ची आवश्यकता असते. मांस, मासे, दूध, चीज, अंडी, तृणधान्ये यांसारख्या अन्नपदार्थांमधून व्हिटॅमिन बी 12 मोठ्या प्रमाात मिळते. तसेच बाजारात व्हिटॅमिन बी 12 च्या अनेक सप्लिमेंट्सही मिळतात. मात्र त्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.