‘व्हिटॅमिन सी’चे अतिसेवन ठरु शकते आरोग्यास हानिकारक, जाणून घ्या शरीरासाठी योग्य मात्रा

व्हिटॅमिन सी चा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत एखाद्याचे आरोग्य सुधारण्याऐवजी ते आणखी बिघडू शकते. (Vitamin C overdose can be bad for your health, know how much it is enough for your body)

'व्हिटॅमिन सी'चे अतिसेवन ठरु शकते आरोग्यास हानिकारक, जाणून घ्या शरीरासाठी योग्य मात्रा
‘व्हिटॅमिन सी’
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 7:43 AM

मुंबई : कोरोना काळात प्रत्येक जण रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेषतः व्हिटॅमिन सी आणि झिंकच्या गोळ्या, च्यवनप्राश, काढा इत्यादींचे सेवन केले जाते. यातही जास्तीत जास्त भर व्हिटॅमिन सी घेण्यावर आहे कारण व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करते असा विश्वास आहे. व्हिटॅमिन सी चे पाण्यामध्ये विघटन होते. शरीर हे साठवूत ठेवत नाही, म्हणून त्याचे पुरेसे स्तर बनवण्यासाठी लोकांना सप्लीमेंट आणि आहाराद्वारे ते घ्यावे लागेल. परंतु या प्रकरणात, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्हिटॅमिन सी चा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत एखाद्याचे आरोग्य सुधारण्याऐवजी ते आणखी बिघडू शकते. (Vitamin C overdose can be bad for your health, know how much it is enough for your body)

शरीरासाठी व्हिटॅमिन सी किती आवश्यक आहे

तज्ज्ञांच्या मते, दररोज 65 ते 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी घेणे कोणत्याही व्यक्तीसाठी पुरेसे असते. परंतु जर आपण 1000 मिलीग्रामपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी घेतले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. सामान्यत: स्त्रियांनी 75 मिलीग्राम, पुरुषांसाठी 90 मिलीग्राम, गर्भवती महिलांसाठी 85 मिलीग्राम आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी 120 मिलीग्रामपर्यंत व्हिटॅमिन सी सेवन करावे.

जास्त प्रमाणात सेवन केल्याने उद्भवू शकतात या समस्या

कोणत्याही गोष्टीचा अभाव आणि अधिक प्रमाण हानिकारक आहे. व्हिटॅमिन सीच्या अति वापरामुळे मळमळ, उलट्या, अतिसार, पोटदुखी, छातीत जळजळ, डोकेदुखी आणि निद्रानाश अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन सी का आहे आवश्यक

व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडेंट आहे जे कनेक्टिव टिश्यूजला चांगले बनवते आणि सांध्याला सपोर्ट देण्याचे कार्य करते. याव्यतिरिक्त, हे कोलेजन, एल-कॅरनिटिन आणि शरीरातील काही न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास उपयुक्त आहे. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. अनेक संशोधनात असे दिसून येते की, व्हिटॅमिन सी तीव्र श्वसन संक्रमण रोखण्यात आणि टीबीवरील उपचारांमध्ये उपयुक्त आहे.

या पदार्थांमधून मिळते व्हिटॅमिन सी

संत्रा, किवी, हिरव्या आणि लाल शिमला मिरची, केळी, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, पालक, पपई, अननस, लिंबू आणि आंबा इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. (Vitamin C overdose can be bad for your health, know how much it is enough for your body)

इतर बातम्या

IIFT Recruitment 2021: सहाय्यक प्राध्यापकांसह अनेक पदांवर निघाली भरती, 2 लाखांपर्यंत मिळणार पगार

आता घरच्या घरी कोरोना चाचणी करणं शक्य, होम बेस्ड टेस्ट किटला मंजुरी, ICMRचा महत्त्वाचा निर्णय

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.