‘व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी!  

लिंबामध्ये (Lemon) ‘व्हिटॅमिन सी’ची (Vitamin C) उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

‘व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी!  
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 7:03 PM

मुंबई : लिंबामध्ये (Lemon) ‘व्हिटॅमिन सी’ची (Vitamin C) उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते (Benefits), त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग (Uses) केला जातो (Vitamin C source Lemon benefits and uses tips).

देशात लिंबू (Lemon) उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा चौथा क्रमांक लागतो. आंतराराष्ट्रीय स्तरावर लिंबाच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे मेक्सिको, भारत आणि अर्जेटिना या देशांचा समावेश होतो. संपूर्ण भारतामध्ये लिंबाचे सुमारे १८ लाख मेट्रीक टन इतके उत्पादन घेण्यात येते. त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे १.४० लाख मेट्रीक टन इतक्या लिंबाचे (Lemon) उत्पादन घेतले जाते.

लिंबाच्या (Lemon)  प्रत्येक भागाचा उपयोग (Uses) केला जातो व फळावर प्रक्रिया केली जाते. लिंबापासून लोणचे, मिश्र लोणचे, सरबत, स्क्रॅश, सुगंधी तेल, लाझ्म कॉर्डिअल, पेक्टीन, सायट्रिक अॅसिड, लायमोनिन तेल, रसायनापासून अर्कपशुखाद्य, तसेच लिंबूसत्व इ. पदार्थ तयार करता येतात. लिंबाचा रस, लिंबाचे तेल, सायट्रिक अॅसिड यांचा निरनिराळ्या औषधी (Benefits) बनविण्यात उपयोग करतात. लिंबाप्रमाणेच, लिंबाच्या सालीचाही उपयोग करता येतो. औषधी गुणधर्माप्रमाणेच लिंबाचा वापर स्वयंपाक घर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि सौंदर्य प्रसाधनातही होतो. (Vitamin C source Lemon benefits and uses tips)

लिंबू आणि लिंबाच्या साली वापर करण्यासाठी काही टिप्स :

  • लिंबु कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.
  • अजीर्ण झाल्यास लिंबू कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो.
  • पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे. त्याने भूक वाढते आणि अन्न नीट पचते.
  • आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहरा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो. (Vitamin C source Lemon benefits and uses tips)
  • रस काढल्यानंतर लिंबाची साल फेकून देवू नये. ती चेहऱ्यावर दोन्ही हातांनी नाजूकपणे घासावी. असे केल्याने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि सौंदर्य खुलते.
  • लिंबाच्या सालीमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमापासून बचाव होतो.
  • गुडघे, कोपर काळवंडले असतील तर थोडा मध लावून लिंबाच्या सालीने त्या भागावर मसाज करावा. काळवंडलेपणा निघून जातो.
  • लिंबाच्या सालीने पायाची, हाताची नखे साफ घासल्याने, ती स्वच्छ होतात आणि त्यांना चकाकीही येते.
  • फ्रिजमध्ये दुर्गंधी येत असेल तर, लिंबाच्या साली ठेवाव्या. यामुळे दुर्गंधी कमी होते.
  • शेगडीवरचे चिकट, तेलकट डाग काढण्यासाठीही लिंबाची साल उपयोगी पडते.
  • लिंबाच्या सालीचा किस हा ‘लेमन झेस्ट’ म्हणून ओळखला जातो. सॅलेड किंवा अनेक पदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही ‘लेमन झेस्ट’चा वापर करू शकता.
  • लिंबाची साल वाळवून त्याची पावडर करून फेसपॅकमध्ये तिचा वापर करू शकता.

(Vitamin C source Lemon benefits and uses tips)

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या :

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

आजारांपासून दूर राहा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे 7 घरगुती उपाय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.