Vitamin-D deficiency : ‘या’ जीवनसत्त्वाचे मानवी जीवनात आहे खूप महत्त्व; याच्या कमतरते मुळे हाडे ठिसूळ होण्यासह उद्भवते न्यूरोलॉजिकल समस्या!
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला दररोज आहारातून अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. हे पोषक अवयव निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करण्यासाठी विशेष भूमिका बजावतात. त्याचबरोबर या पोषकतत्त्वांची कमतरता तुम्हाला गंभीर समस्यांनाही बळी पडू शकते. जाणून घ्या, नवीन अभ्यासात काय माहिती समोर आली आहे.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला दररोज आहारातून अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. हे पोषक अवयव निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करण्यासाठी विशेष भूमिका बजावतात. त्याचबरोबर एका अभ्यासात, व्हिटॅमिन-डी (Vitamin-D) शरीरासाठी अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. त्याच्या कमतरतेमुळे केवळ हाडे कमकुवत होत नाहीत, तर यामुळे न्यूरोलॉजिकल समस्या (Neurological problems) देखील उद्भवू शकतात. सर्व वयोगटातील लोकांनी आहारातून या जीवनसत्त्वाच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष द्यावे. असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन-डी चा प्रमुख स्रोत मानला जातो. दरम्यान, लोकांमध्ये बैठ्या जीवनशैलीची समस्या वाढत आहे आणि लोकांना सूर्यप्रकाश कमी (Less sunlight) पडत आहे. अमरउजाला मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बहुतेक लोक व्हिटॅमिन-डीच्या कमतरते सबंधी तक्रारी करतात. या व्हिटॅमिनच्या सततच्या कमतरतेमुळे मेंदूशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो, तसेच रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांमध्ये कमकुवतपणा येऊ शकतो.
अभ्यासात काय आढळले?
अभ्यासात असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन-डी हे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या पोषक तत्वांपैकी एक आहे. हे निरोगी मेंदूच्या पेशी आणि त्यांची कार्य करण्याची क्षमता वाढविण्यात देखील उपयुक्त आहे. म्हणून, ज्या लोकांना व्हिटॅमिन-डीची कमतरता आहे त्यांना न्यूरोलॉजिकल रोग आणि न्यूरोसायकोलॉजिकल विकारामुळे संज्ञानात्मक कमजोरी होण्याचा धोका असू शकतो. अशा लोकांच्या मेंदूच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो.
उदासीनता देखील होऊ शकते
अभ्यासाने व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा संबंध नैराश्याशी देखील जोडला आहे. जर्नल ऑफ डायबिटीज रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या 2017 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन-डी पूरक आहार टाइप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांचा मूड सुधारण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. अभ्यासांनी व्हिटॅमिन डीच्या कार्याची पुष्टी केली आहे न्यूरोस्टेरॉइड, जे सामान्य मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मल्टिपल स्क्लेरोसिस, अल्झायमर रोग, पार्किन्सन रोग आणि न्यूरोलॉजिकल विकारांचा धोका वाढू शकतो. सर्व वयोगटातील लोकांनी त्याच्या नियमित सेवनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची इतर लक्षणे
न्यूरोलॉजिकल समस्यांव्यतिरिक्त, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुमच्यासाठी इतर अनेक समस्या उद्भवू शकतात, लक्षणे अनेकदा थकल्यासारखे वाटणे, सांधेदुखी, स्नायू कमकुवत होणे, मूड बदलणे हे सामान्य आहे. हाडे निरोगी ठेवण्यासाठी या व्हिटॅमिनची विशेष गरज आहे, अशा परिस्थितीत या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडांशी संबंधित आजार जसे की संधिवात किंवा वेदना इत्यादींचा धोका वाढू शकतो. या संदर्भात प्रत्येकाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
यांच्या मध्ये व्हिटॅमिन-डीची कमतरता
औषधे आणि पूरक आहारांची विस्तृत उपलब्धता असूनही, काही लोक आहेत ज्यांना व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेचा धोका जास्त असतो. अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोहन रोग यासारख्या आतड्यांसंबंधी समस्या असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता अनेकदा दिसून येते. याशिवाय लठ्ठ लोकांमध्ये त्याची पातळी कमी असू शकते. याशिवाय जे लोक लैक्टोज इंटॉलरेंट(अपचनामुळे पोट फुगी) आहेत त्यांना देखील या जीवनसत्त्वाची कमतरता भासू शकते.