निरोगी शरीरासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम, जाणून घ्या वयानुसार किती चालणे फायदेशीर?

निरोगी जीवनशैलीसाठी चालणे खूप महत्त्वाचे आहे. चालणे हा इतर व्यायामांपेक्षा सर्वात सोपा व्यायाम आहे. पण कोणत्या वयात किती चालावे आणि त्याचे फायदे काय आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

निरोगी शरीरासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम, जाणून घ्या वयानुसार किती चालणे फायदेशीर?
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 7:40 PM

आपले शरीर निरोगी राखण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे म्हटले जात असते. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. मात्र रोजच्या धावपळीत अनेकदा तासंतास कसरत करणे कठीण जाते अशा परिस्थितीत चालणे हा कमी प्रयत्नात स्वतःला निरोगी ठेवण्याचा एक मार्ग आहे. परंतू वयानुसार प्रत्येकाने किती मिनिटे चालणे आवश्यक असते. याची माहीती आपण आता घेऊयात….

चालणे हा व्यायामाचा एक भाग आहे. जो सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चालल्यामुळे तुम्ही निरोगी राहता. चालणे हा इतर व्यायामांपेक्षा सर्वात सोपा व्यायाम आहे. निरोगी जीवनशैलीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि आजच्या काळात प्रत्येकासाठी त्यांच्या वयानुसार चालणे फायदेशीर ठरते. तुमच्या वयानुसार किती मिनिटे चालले पाहिजे ते जाणून घ्या.

18 ते 30 वर्षे

तरुण आणि प्रौढांमध्ये उच्च ऊर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद असते. त्यामुळे ते दररोज 30 ते 60 मिनिटे वेगाने चालू शकतात. या टप्प्यावर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे आणि चालणे खूप महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

31 ते 50 वर्षे

वयाच्या 31 ते 50 व्या वर्षी तुम्ही दररोज 30 ते 45 मिनिटे चालले पाहिजे. नियमित चालल्याने वजन नियंत्रणात राहण्यास, स्नायू मजबूत ठेवण्यास आणि जुनाट आजारांपासून बचाव तसेच मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते. यासाठी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालले पाहिजे.

51 ते 65 वर्षे

51 ते 65 वर्ष वयोगटातील लोकांसाठी दिवसातून 30 ते 40 मिनिटे चालणे चांगले आहे. मध्यम वयात शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे लोकांना स्नायू कमकुवत आणि चयापचय कमी झाल्यासारखे वाटू लागते आणि यासाठी चालणे खूप महत्त्वाचे आहे.

66 ते 75 वर्षे

वृद्धांसाठी दिवसातून सुमारे 20 ते 30 मिनिटे चालणे खूप महत्त्वाचे आहे. या वयात चालणे वृद्धांची ऊर्जा टिकवून ठेवून हृदयाशी संबंधित आजार टाळता येतात. मग वयाच्या 66 ते 75 व्या वर्ष नियमित चालल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो आणि तुमचे आरोग्य हे चांगले राहते असे विविध संशोधनातून दिसून आले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.