Skin Care | चमकदार त्वचा हवीय? घरच्या घरी ट्राय करा ‘वॉलनट स्क्रब’!

बहुतेक लोक हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी अक्रोड खातात.

Skin Care | चमकदार त्वचा हवीय? घरच्या घरी ट्राय करा ‘वॉलनट स्क्रब’!
अक्रोड
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 12:58 PM

मुंबई : बहुतेक लोक हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी अक्रोड खातात. अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते. अक्रोड हा सुक्यामेव्यातील असा एक घटक आहे जो आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मिठाईबरोबर अक्रोड अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये देखील वापरला जातो (Walnut scrub for glowing skin).

अक्रोडमध्ये ओमेगा-3 हा घटक असतो, जो त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतो. अक्रोड ही स्कीन स्क्रबसाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे. ज्याचा वापर केल्याने आपली त्वचा चमकदार दिसते. याव्यतिरिक्त, अक्रोड त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ ठेवते.

घरच्या घरी तयार करा ‘अक्रोड स्क्रब’

स्क्रबसाठी लागणारे साहित्य :

– अक्रोड

– आवळा

– मध

स्क्रब बनवण्याची कृती :

– मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 अक्रोड घाला आणि चांगली बारीक पूड करा. अक्रोड पूड करत असताना लक्षात ठेवा की अक्रोड पूर्ण बारीक न करतात, त्याची जाडसर पूड करा.

– या पूडमध्ये एक चमचा मध मिसळून त्याचे घट्ट मिश्रण तयार करा.

– याशिवाय एक ते दोन आवळे बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्या आणि वरील मिश्रणात मिसळा. आवळा त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो.

– हा स्क्रब एका जारमध्ये भरून ठेवू शकता. किमान एक ते दोन महिने हा स्क्रब टिकून राहील (Walnut scrub for glowing skin).

कसा वापराल?

– अक्रोडचा स्क्रब हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार मोशनमध्ये चेहऱ्यावर मसाज करा.

– किमान 5 मिनिटे चेहरा व्यवस्थित स्क्रब करा आणि नंतर 2 मिनिटे चेहऱ्यावर हे मिश्रण राहू द्या.

– यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि चेहरा कोरडा झाल्यावर मॉइश्चरायझर लावा.

अक्रोडचे सेवन लाभदायी

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन-ई असते, जे टाइप -2 मधुमेहापासून तुमच्या शरीराचे रक्षण करते. अक्रोड हृदयरोगासाठी देखील खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. अक्रोड केवळ आपली साखर नियंत्रित ठेवत नाही तर, कोलेस्टेरॉलची पातळीही कमी करते.

अक्रोडमध्ये 19 पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अक्रोडमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीजदेखील मोठ्या प्रमाणता आढळते. याशिवाय ओमेगा 3, फॅटी अॅसिडस् आणि लिनोलिक अॅसिडदेखील अक्रोद्मध्ये आढळते. अक्रोडचे हे गुणधर्म हृदयाला सुरक्षित ठेवतात. तसेच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, अक्रोडमध्ये लक्षणीय प्रमाणात मेलाटोनिन आढळते, ज्यामुळे झोपेची समस्या दूर होते. जर तुम्हालाही नीट झोप येत नसेल तर, झोपण्यापूर्वी अक्रोड नक्की खा.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Walnut scrub for glowing skin)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.