Smart Hacks : घरात पाली नकोय?; मग या टिप्स नक्की फॉलो करा!

घरातील पालींना पळवून लावण्यासाठी तुम्हाला या टिप्स नक्की उपयोगी पडतील. (Want to remove lizards from home ? Then follow these tips for sure)

Smart Hacks : घरात पाली नकोय?; मग या टिप्स नक्की फॉलो करा!
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 4:39 PM

मुंबई : आपल्याला नेहमी वाटतं की आपलं घर स्वच्छ आणि निटनेटकं राहावं. मात्र हे इतकं सोपं नाहीये. व्यस्त जीवनात आपल्यापैकी अनेक जण घरगुती साफसफाई करण्यास असमर्थ ठरतात. यामुळे घरात बर्‍याच ठिकाणी जाळे होतात आणि किडे आणि पाल यासारखे प्राणी आढळून येतात. (Want to remove lizards from home ? Then follow these tips for sure)

घरातील पालींना हाऊस जिकोस असं म्हणतात. त्या विषारी नसतात, मात्र त्या एकदा घराच्या आत गेल्या की लवकर आपले घर सोडत नाहीत. म्हणून, त्यांना शक्य तितक्या लवकर घराबाहेर काढलं पाहिजे. जे तुमच्या घरासाठीही चांगले आहे. या पालींपासून मुक्त होण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत, त्या पालींचा जीव न घेता तुम्ही अशा प्रकारे त्यांना घराबाहेर काढू शकता.

मिरेपूडचा स्प्रे वापरा 

काळी मिरी हा एक घटक आहे ज्याचा पालींना त्रास होतो आणि त्यांना अलर्जि निर्माण करतो. आपण घरी मिरपूड पावडर मिक्स करू शकता आणि प्रत्येक कोपऱ्यात फवारणी करू शकता. काळी मिरी पावडरऐवजी तिखट किंवा लाल तिखट वापरू शकता.

घराच्या कोपऱ्यांमध्ये अंड्याची साल ठेवावी 

अंड्यांचे साल फेकू नका. आपल्या घरात पालींपासून मुक्त होण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो. अंड्याच्या सालांना  कपड्याने पुसून टाका आणि जेथे सरडे वारंवार येतात तेथे ठेवा. अंड्याचा वास पालींना आवडत नाही. त्यामुळे त्या अशा ठिकाणी येत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही पालींना पळवून लावू शकता.

घराच्या कोपऱ्यांमध्ये कांदा किंवा लसूण ठेवा

कांदा आणि लसूण या दोन्ही गोष्टींना तीव्र वास आहे, हा वास घरातील पाली दूर करण्यास मदत करू शकतो. पालींना पळवून लावण्यासाठी घरातील कोपऱ्यांमध्ये कांदा लसूनचे तुकडे ठेवा. असं केल्यास घरातील पाली निघून जातील आणि परत कधीही येणार नाहीत.

 नेफ्थलीनच्या बॉलचा वापर करा 

उंदीर आणि कीटकांपासून कपड्यांचा बचाव करण्यासाठी नेफ्थलीन बॉलचा वापर केला जातो. हे बॉल्स पालींपासून मुक्त होण्यास प्रभावी आहेत कारण या बॉलमधून येणारा वास पालींना सहन होत नाही. हे बॉल तुम्ही ड्रॉवरमध्ये,शेल्फजवळ आणि घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता.

संबंधित बातम्या

Photo : दिया मिर्झा प्रेग्नंट, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच बेबी बम्पसह फोटो शेअर

Photo : मिथिला पालकरचा क्लासी अँड ट्रेंडी लूक

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.