असाही एक देश, जिथे लग्नापूर्वी नवरीला महिनाभर रडण्याची करावी लागते प्रॅक्टिस; नाही तर बसतो मार
चीनच्या सिचुआन प्रांतातील तुजिया आदिवासी जमातीत एक अद्भुत लग्नसंस्कृती आहे. लग्नापूर्वी नवरीला एक महिना रडण्याची प्रॅक्टिस करावी लागते; न रडल्यास शिक्षा होते. हे रडणे शुभ मानले जाते. ही परंपरा शतकानुशतके जुनी असून राजकुमारीच्या रडण्यावरून सुरू झाल्याचे मानले जाते. लग्नाच्या दिवशी नवरी आणि तिचे कुटुंब पारंपारिक गाणी गाऊन भावना व्यक्त करतात.
लग्न म्हणजे आनंदाचा दिवस. उत्साहाचा दिवस हे तुम्हाला माहीत आहे. पण लग्नाचा अर्थ आनंदाचा दिवस नाही हे तुम्हाला माहीत आहे का? भारतात लग्नाचा मोठा थाटमाट असतो. प्रथा परंपरा काही असो. पण लग्नाचा मोठा थाटमाट केला जातो. पण चीनमधील आदिवासी जमातीतील एक प्रथा मात्र वेगळीच आहे. लग्नात नवरी सासरी जाताना रडते हे सर्वांना माहीत आहे. पण चीनच्या या आदिवासी जमातीत नवरीचं रडणं शुभ मानलं जातं. त्यासाठी नवरीला महिनाभर रडण्याची प्रॅक्टिस करावी लागते. तिला रडण्यासाठी उकसवलं जातं. तिच्या डोळ्यातून अश्रू आले नाही तर तिची आई तिला चोप देते. पण तिला रडायला भाग पाडते.
भारतात लग्न सोहळा म्हणजे एक पर्वणीच असते. पण चीनच्या दक्षिण पश्चिमेकडील सिचुआन प्रांतातील तुजिया आदिवासी जमातीत अत्यंत वेगळ्या प्रकारे लग्न होतं. हजारो वर्षापासून या जमातीचे लोक या ठिकाणी राहत आहेत. तेव्हापासून या जमातीत ही प्रथा आहे. नवरीने लग्नात रडलंच पाहिजे, असं या जमातीचं मत आहे. कारण नवरी नवऱ्याच्या घरी जाताना रडणं हे शुभ मानलं जातं. नवरीला लग्न झाल्यावर रडता यावं म्हणून महिन्याभर तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते. या अनोख्या परंपरेची सुरुवात 475 ईसवी सनापूर्वी ते 221 ईसवी सनापूर्वीच्या दरम्यान झाल्याचं सांगितलं जातं. 17 व्या शतकात ही परंपरा व्यापक प्रमाणात पाळली जात होती.
पारंपारिक गाणी गातात
या प्रथेबाबतचीही एक वेगळी कहाणी आहे. जाओ राज्याच्या राजकुमारीचं लग्न झालं होतं. तेव्हा ती आईपासून दूर होण्याच्या कल्पनेने धायमोकलून रडली होती. तिचं हे रडणं पाहून अनेकजण हेलावले होते. आपल्या राज्याची राजकुमारी अशा पद्धतीने रडल्याचं पाहिल्यानंतर नवरीने लग्नात रडण्याची प्रथाच सुरू झाली. लग्नाच्या एक महिना आधी ही अनोखी परंपरा सुरू झाली. नवरीच्या कुटुंबाकडून ही परंपरा अत्यंत श्रद्धेने निभावली जाते. एका तासासाठी नवरीला रडायचं असतं. यावेळी कुटुंबातील महिला तिच्याजवळ बसून पारंपारिक गाणी गातात. नवरीच्या जीवनात येणारा बदल आणि कुटुंबाशी संबंधित भावना या गीतात असतात.
घरातील मंडळीही रडतात
पहिल्या दिवशी नवरी एकटी रडत नाही. तिच्यासोबत तिची आणि आजीही रडते. तिघीही ओक्साबोक्शी रडतात. पूर्ण भावना ओतून रडतात. आपली मुलगी आपल्या पासून दूर जाणार ही आईच्या मनात भावना असते तर आपल्याला माहेर मुकणार ही नवरीच्या मनात भावना असते. त्या भावनेमुळे दोघीही धायमोकलून रडतात. त्यानंतर पुढचे 29 दिवस दिवस फक्त नवरी रडते. जसजसे दिवस जातात तसतशा नवरीच्या भावना अत्यंत गहिऱ्या होतात. त्या अंत:करणातून रडू लागतात.