Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्या ‘लवंग चहा’, झपाट्याने कमी होईल लठ्ठपणा!

चहा पिण्यास आवडत असल्यास आपल्या नियमित चहाऐवजी ‘लवंग चहा’ (Clove Tea) पिऊ शकता. हा चहा प्यायल्याने तुमची चयापचय शक्ती वाढेल आणि त्यातील औषधी घटकांमुळे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहील.

Weight Loss | वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्या ‘लवंग चहा’, झपाट्याने कमी होईल लठ्ठपणा!
लवंग चहा
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 7:44 AM

मुंबई : भारतीय मसाले केवळ स्वादिष्ट नाहीत, तर त्याहीपेक्षा ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आपण आपल्या सगळ्याच अन्नात मसाले वापरतो. बर्‍याच मसाल्यांमध्ये औषधी गुण देखील असतात. ‘लवंग’ हा मसाल्यातील एक असा घटक आहे, जो आपल्याला घरी सहज मिळतो. ही लहानशी दिसणारी लवंग आपल्याला निरोगी ठेवण्यास, तसेच वजन कमी करण्यासाठी मदत करते. यात अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे पाचन शक्ती वाढवण्यात मदत करतात (Weight Loss tips Clove Tea Can reduce your weight fast).

आपल्याला चहा पिण्यास आवडत असल्यास आपल्या नियमित चहाऐवजी ‘लवंग चहा’ (Clove Tea) पिऊ शकता. हा चहा प्यायल्याने तुमची चयापचय शक्ती वाढेल आणि त्यातील औषधी घटकांमुळे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहील. चला तर, हा लवंग चहा कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊया.

कसा बनवाल लवंग चहा?

– 2 कप पाणी

– 4 ते 5 लवंगा

– अर्धा इंच दालचिनीचा तुकडा

– अर्धा इंच आले

– लिंबाचा रस

कृती :

एका भांड्यात 2 कप पाणी घाला आणि उकळल्यानंतर त्यात 4 ते 5 लवंगा, दालचिनी आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घाला. सुमारे 15 ते 20 मिनिटे याला उकळी येऊ द्या. त्यानंतर, हा चहा गाळा आणि वर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून प्या.

वजन कमी करण्यात फायदेशीर

हा मसालेदार चहा आपल्या पचनसाठी फायदेशीर आहे. त्यात असलेल्या लवंगा आणि इतर गोष्टी पचन क्रिया सुधारतात. हा चहा दररोज प्यायल्याने वजन कमी होते. मसाले आपला चयापचय दर वाढवण्यासाठी काम करतात, ज्यामुळे चरबी जलदगतीने कमी करण्यात मदत होते.

स्कीन इन्फेक्शन

लवंगामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे त्वचेच्या समस्या दूर करण्यात मदत करतात. यासह, हे शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्याचे काम करतात. यातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास देखील मदत करतात. ज्यामुळे तावचेवर सुरकुत्या, डाग आणि वृद्धत्व टाळण्यासाठी मदत होते (Weight Loss tips Clove Tea Can reduce your weight fast).

सायनसपासून आराम मिळतो

हा खास चहा सायनसपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकतो. मसाल्यामध्ये उपस्थित युजेनॉल कफ दूर करण्यास आणि त्यापासून आराम देण्यास मदत करतात. लवंगामध्ये व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के असते जे बॅक्टेरियांशी लढायला मदत करते. याशिवाय ही चहा ताप बरे करण्यासही मदत करते.

दात-हिरड्यांसाठी फायदेशीर

या चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्या दूर करण्यात मदत करतात. लवंगाचा हर्बल चहा तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकण्यास देखील मदत करतो. ज्यामुळे दातांच्या समस्यांपासून लवकरच मुक्ती मिळते.

लवंग चहा पिण्याचे तोटे :

मसालेदार चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने आपले नुकसान देखील होऊ शकते. दिवसातून 1 ते 2 वेळाच लवंगयुक्त चहा प्या. जास्त चहा घेतल्यामुळे स्नायू वेदना, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी लवंगाचे जास्त सेवन करू नये. जास्त मसाले खाणे आपल्या बाळासाठी हानिकारक आहे. हा चहा प्यायल्यानंतर आपल्याला उलटी झाल्यासारखे वाटत असेल, तर तो पिऊ नका.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

(Weight Loss tips Clove Tea Can reduce your weight fast)

हेही वाचा :

Almond Benefits | सोलून खावेत की पाण्यात भिजवून? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत

Health Tips :  हाडे नेहमी मजबूत ठेवायचीत? मग, आहारात नक्की सामील करा ‘हे’ 5 सुपरफूड्स

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.