मेडी फेशियलचे म्हणजे नेमकं काय त्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या

मेडी फेशियल हे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार प्रशिक्षित त्वचाविकार तज्ज्ञांद्वारे केले जाते. पुरुष आणि स्त्रियांमध्ये त्वचेच्या सौदर्याबाबत वाढलेल्या जागरुकतेने मेडी फेशियलची संकल्पना पुढे आली आहे. याचे नेमके कोणते फायदे आहेत काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.

मेडी फेशियलचे म्हणजे नेमकं काय त्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या
Medi Facial
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 7:22 PM

मुंबई : त्वचेच सौंदर्य खुलून दिसावे तसेच चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या, पुरळ, मुरुम, निस्तेज त्वचा व कोरडेपणा दूर करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशीअल करुन घेतले जाते. मात्र आता त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वचेच्या समस्येचा अभ्यास करुन खास मेडी फेशियल केले जाते ज्याला सध्या मोठ्या प्रमाणात पसंती मिळते आहे. याबाबत र्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

ऑक्सी फेशियल, हायड्रा फेशियल, स्किन रिजुव्हेनेटिंग आणि ग्लो फेशियल आणि अँटी-एजिंग फेशियल अशा विविध प्रकारांमध्ये मेडिशिअल उपलब्ध आहे. ते वेगवेगळ्या नावाखाली येतात आणि त्वचेच्या प्रकारानुसार त्याचा प्रकार ठरवला जातो. मेडी-फेशियल, हे स्किनकेअर उपचार आहेत जे परवानाधारक वैद्यकीय त्वचाविकार तज्ज्ञांद्वारे त्यांच्या क्लिनीकमध्ये केले जाते. त्वचेच्या विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्यासाठी यामध्ये वैद्यकीय घटक आणि तंत्रज्ञानाचा समावेश केला जातो.

काय आहेत फायदे?

त्वचारोग तज्ञ हे पात्र डॉक्टर आहेत जे प्रत्येक त्वचेचा प्रकार आणि त्याच्या गरजा समजून घेतात. जेव्हा तुम्ही मेडी फेशियलसाठी त्वचारोग तज्ज्ञांची भेट देता, तेव्हा ते तुमच्या त्वचेचा प्रकार, त्वचेच्या स्थितीचे विश्लेषण करतील आणि नंतर तुमच्या त्वचेला आवश्यक असलेल्या नैसर्गिक घटकांची शिफारस करतील. पुरळ असो, पिग्मेंटेशन असो, बारिक रेषा असोत किंवा त्वचेचा पोत सुधारणे असो त्यानुसार मेडी फेशियल कस्टमाइज करता येते.

संवेदनशील त्वचेची आवश्यकता समजून त्यानुसार फेशीयल निश्चित केले जाते. मेडी फेशियलची सामान्य प्रक्रिया एक्सफोलिएशन, स्किन ट्रीटमेंट, सीरम, क्रीम आणि मसाज यासह नियमित प्रक्रियांसारखीच आहे परंतु यामध्ये पोषक घटक व आधुनिक उपकरणांचा समावेश केला जातो.

फक्त क्लिनिकल दर्जाच्या उत्पादनांचा वापर:

मेडी-फेशियल वैद्यकीय दर्जाच्या स्किनकेअर उत्पादनांचा वापर करतात ज्यात हायलुरोनिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, एएचए आणि बीएचए, जीवनसत्त्वे इत्यादीसारख्या सक्रिय घटकांचा वापर केला जातो. ही उत्पादने त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी अधिक प्रभावी ठरतात. ओव्हर-द-काउंटर पर्याय. मेडी फेशियल त्वचेची दुरुस्ती, पोषण आणि समतोल राखण्यासाठी असतात.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर: त्वचा विकार तज्ज्ञांना प्रगत तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना लेझर, मायक्रोडर्माब्रेशन, केमिकल पील्स आणि एलईडी थेरपी यांच्या वापराविषयी खास प्रशिक्षण दिले जाते. या प्रक्रियेच्या वापरासाठी तज्ञांचे ज्ञान आणि पात्रता आवश्यक आहे.

त्वचारोग तज्ञांना त्वचेविषयी सर्वप्रकारचे ज्ञान असते. त्वचारोग तज्ञांना त्वचेच्या स्थितीचे विस्तृत ज्ञान असते आणि ते मूलभूत समस्यांचे निदान करू शकतात ज्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असू शकते. ते विशिष्ट स्किनकेअर घटकांसाठी असलेला ऍलर्जी देखील ओळखू शकतात. मेडी-फेशियल मुरुम, रोसेसिया, हायपरपिग्मेंटेशन आणि एक्जिमा यासारख्या त्वचेच्या अनेक समस्यांना प्रभावीपणे संबोधित करू शकतात. ते योग्य उपचार आणि स्किनकेअर दिनचर्या देखील सुचवू शकतात. त्वचेची समस्या आणि त्यांचे मूल्यांकन यावर अवलंबून मेडीफेशियल हे त्वचेच्या सुरकुत्या, निर्जलीकरण निस्तेज आणि ठिसूळ त्वचा इत्यादींवर उपचार करण्यासाठी मेडी फेशियलमध्ये बदल करू शकतात.

दीर्घकाळ टिकणारे परिणाम: तज्ज्ञ त्वचाविज्ञानी द्वारे केल्यावर मेडी फेशियल प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी तयार केले जातात आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम देतात कारण ते त्वचेच्या समस्यांच्या मूळ कारणांना टार्गेट करतात आणि कोलेजन उत्पादनास उत्तेजन देतात. नितळ, घट्ट आणि मजबूत करण्यासाठी हे पर्याय उत्तम ठरतात.

सुरक्षितता: त्वचाशास्त्रज्ञ निर्जंतुकीकरण आणि नियंत्रित वातावरणात कार्य करतात, त्यामुळे या प्रक्रियेदरम्यान आणि नंतर त्वचेवर आणि शरीरावर संक्रमण किंवा प्रतिकूल प्रतिक्रियांचा धोका कमी करतात.

फॉलो-अप केअर: त्वचाविकार तज्ज्ञ हे उपचारानंतरच्या घ्यावयाच्या काळजीबद्दल मार्गदर्शन करु शकतात आणि तुमच्या मेडी-फेशियलच्या उत्तम परिणामासाठी आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी विविध उत्पादनांची शिफारस करतात. त्वचेच्या सध्याच्या समस्यांचे निराकरण करण्याव्यतिरिक्त, त्वचाविकार तज्ज्ञ तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक स्किनकेअर उत्पादने वापरण्याचा सल्ला देऊ शकतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.