अखेर गुपित उघड झालंच, मुलींना आवडतात ‘या’ टाईपची मुलं
इंडियाना विद्यापीठाच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, मुलींना वेगळ्या डोळ्यांच्या रंगाचे, आकर्षक केसांचे आणि चांगल्या नोकरीचे मुलं जास्त आकर्षक वाटतात. चांगले हावभाव आणि स्वभावही मुलींसाठी महत्त्वाचे ठरतात.
मुलींच्या मनात काय चालू असतं याचा थांगपत्ता लागणं तसं कठीण आहे. कारण कुणाच्याही मनातलं ओळखण्याचं यंत्र अजून सापडलेलं नाही. आणि मुली तर आपल्या मनातील गोष्ट कुणालाही बिलकूल सांगत नाहीत. त्यामुळे मुलींच्या मनात काय चालू आहे हे कळणं थोडं कठिणच. त्यातही मुलींना कोणत्या टाईपचे मुलं आवडतात? कोणत्या टाईपच्या मुलांसोबत संबंध ठेवायला आवडतात? हे सांगणं तर महाकठिण. पण एका संशोधनाने आता ही गोष्ट उघड झाली आहे. मुलींना कोणत्या टाईपच्या मुलांसोबत संबंध ठेवायला आवडतात हे उघड झालं. आहे.
डेली मेलमध्ये ही बातमी प्रकाशित झाली आहे. इंडियाना विद्यापीठातील संशोधकांनी एक शोध लावला आहे. कोणत्या प्रकारच्या मुलांसोबत संबंध ठेवण्यास मुली लवकर तयार होतात, याचा शोध या संशोधकांनी लावला आहे. मुलींना कोणत्या प्रकारच्या मुलांसोबत मैत्री करावी वाटते किंवा रिलेशनशीप करावी वाटते याचाच आपण आज आढावा घेणार आहोत. संशोधकांनी काय म्हटलंय तेही जाणून घेणार आहोत.
डोळ्यांचा रंग
इंडियाना यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 140 मुलींचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. ज्या मुलांच्या डोळ्यांचा रंग वेगळा असतो, ज्यांचे डोळे अत्यंत आकर्षक असतात, अशा मुलांसोबत संबंध ठेवायला मुली लवकर तयार होतात. त्यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये राहायला या मुलींना आवडतं. एवढेच नव्हे तर मैत्री, रिलेशनशीप आणि लग्न यातील कोणतीही गोष्ट करण्यास या मुली तयार होतात.
केसांची स्टाईल
संशोधकांच्या मतानुसार, मुलींना मुलांचे केस सर्वाधिक आवडतात. ज्यांच्या केसांची स्टाईल अप्रतिम आहे, अशा मुलांसोबत रिलेशन ठेवण्यास या मुली तयार होतात. ज्यांचे केस लांब असतात, अशा मुलांकडे मुली लवकर आकर्षित होतात. जेव्हा आम्ही या मुलींसोबत चर्चा केली, तेव्हा त्यांनी लांब केस असलेली मुलं आमच्यासाठी ड्रीम बॉय आहेत, असं या मुलींनी सांगितल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
चांगली नोकरी
इंडियाना यूनिव्हर्सिटीचे संशोधक नेशन फ्रँक म्हणाले की, आजच्या काळात मुली पैसा आणि प्रतिष्ठेला अधिक महत्त्व देतात. आणि हे सर्व असणाऱ्या मुलांसोबत रिलेशनशीपला तयार होतात. ज्या मुलांकडे चांगली नोकरी असते, किंवा चांगले पैसे किंवा घर असतं अशा मुलांसोबत त्या घरोबा करतात. अशा मुलांसोबत रिलेशनशीप ठेवणं त्यांना मोठेपणाचं लक्षण वाटतं. लग्नासाठीही त्यांना अशीच मुले पसंत असतात.
चेहऱ्याचे हावभाव
ज्यांच्या चेहऱ्याचे हावभाव चांगले असतात असे मुलेही मुलींना खूप भावतात. हसतमुख स्वभावाचे हे तरुण असतात. मुली अशा मुलांसोबत संबंध ठेवायला लवकर तयार होतात. कारण या स्वभावाचे तरुण कधीच बोअर करत नसल्याचं त्यांना वाटतं. मुलींना इज्जत आणि सन्मान देतात असं त्यांना वाटतं. ज्या मुलांच्या चेहऱ्यावर चमक आणि अभिमान असतो अशा मुलांवर मुली प्रेम करतात. त्यांच्यासोबत रिलेशनशीप करायला तयार होतात.