पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण करेल हा मोबाईलचा नवीन आजार, काय आहे नेमकं जाणून घ्या?
पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण करणारा आता एक नवा आजार समोर आलेला आहे. एका संशोधनानुसार हा आजार व्यक्ती जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करते ज्याने पती- पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. नेमका हा आजार काय आहे हे जाणून घेऊयात...

Phubbing Meaning: ‘फबिंग’ हा एक नवीन डेटिंग शब्द इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. हा शब्द फोन आणि इग्नोरिंग या दोन शब्दांना एकत्र करून बनवला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करून फोनला प्राधान्य देते तेव्हा ते एकमेकांमध्ये नकारात्मकता निर्माण करते.
फबिंग म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवत असता, पण तुमचा जोडीदार हा नेमकं मोबाईलमध्ये वारंवार स्क्रोल करण्यात, चॅट करण्यात किंवा सोशल मीडियावर व्यस्त असतो, तेव्हा त्याला फबिंग म्हणतात. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करते आणि फोनला पहिले प्राधान्य देते तेव्हा एकमेकांच्या मनात नकारात्मक विचार तयार होतात. हे अनेकांना सामान्य वाटू शकते, परंतु हळूहळू यामुळे नातेसंबंधातील भावनिक अंतर वाढू शकते आणि जोडीदाराला एकटे वाटण्याबरोबरच दुर्लक्षित केले जाऊ शकते.
नातेसंबंधांवर फबिंगचे परिणाम
मानसशास्त्रीयदृष्ट्या, जेव्हा एखादी व्यक्ती फोनमुळे त्याच्या जोडीदाराकडे वारंवार दुर्लक्ष करते, तेव्हा त्याचा स्वाभिमान दुखावू शकतो. यामुळे तणाव, संघर्ष आणि नातेसंबंधाची गुणवत्ता घसरू शकते. एका संशोधनानुसार, जे कपल्स किंवा पती-पत्नी यांच्यामध्ये अनेकदा फबिंग होत असते, त्यात वारंवार असे घडत असल्याने त्यांच्यात जास्त भांडणे होतात. अशा नात्यांमध्ये भावनिक ओढ कमी होते आणि कधीकधी ते ब्रेकअप किंवा घटस्फोटापर्यंत देखील पोहोचू शकते.
फबिंग टाळण्याचे मार्ग
1. फोन-फ्री वेळ सेट करा: तुमच्या जोडीदारासोबत क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी तुमचा फोन काही काळ सायलेंट मोडवर ठेवा.
2. संवाद वाढवा: जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि तुम्हाला कसे वाटते ते समजावून सांगा.
3. डिजिटल डिटॉक्सचा अवलंब करा: दररोज तुमच्यातला काही वेळ असा ठेवा जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार फोनशिवाय एकमेकांसोबत वेळ घालवता.
4. एकमेकांना प्राधान्य द्या: नात्यात आदर आणि प्रेम राखणे महत्वाचे आहे, म्हणून फोनऐवजी समोरच्या व्यक्तीला जास्त महत्त्व द्या.
फबिंग ही एक धोकादायक सवय बनत चालली आहे, जी नातेसंबंधांवर परिणाम करत आहे. जर ते वेळीच थांबवले नाही तर ते नाते कमकुवत आणि भावनिकदृष्ट्या असंतुलित बनवू शकते. म्हणून, तुमच्या स्मार्टफोनपेक्षा तुमच्या जोडीदाराकडे जास्त लक्ष द्या आणि तुमचे नाते अधिक मजबूत करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)