Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बनारसी साडी – कांजीवरम साड्यांमध्ये हा फरक ओळखा; अन्यथा खरेदी करताना होईल फसगत

बनारसी आणि कांजीवरम साड्या खरेदी करताना महिलांचा गोंधळ उडतो. तुम्हालाही या दोन साड्यांमधला फरक समजत नसेल तर या लेखात काही मुद्दे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे तुम्हाला या दोन साड्यांमधला फरक नीट समजण्यास मदत होईल. त्या मदतीने बाजार साडी खरेदी करताना तुमची फसवणूक होणार नाही.

बनारसी साडी - कांजीवरम साड्यांमध्ये हा फरक ओळखा; अन्यथा खरेदी करताना होईल फसगत
Nita AmbaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 1:07 PM

सणावाराच्या विशेष प्रसंगी महिला मोठ्या प्रमाणावर साड्यांची खरेदी करतात. कारण आपल्या भारतीय महिलांचा वॉर्डरोब साडीशिवाय अपूर्ण मानला जातो. प्रत्येक खास प्रसंगासाठी परफेक्ट साडी नक्कीच सापडते. तुम्ही सणासाठी खास पारंपरिक साड्या घेण्याचा विचार करता तेव्हा तुमच्यासाठी बनारसी आणि कांजीवरम साड्या उत्तम ठरतील. कारण या साड्यांचा लुक एकदम रॉयल दिसतो. तसेच या साड्या त्यांच्या कामगिरीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत.

मात्र या साड्यांच्या फॅब्रिकमध्ये आणि डिझाईनमध्ये आणि बनवण्याच्या पद्धतीमध्ये खूप फरक आहे. बऱ्याच महिलांना या दोन साड्यांमधील फरक समजत नाही. त्यामुळे अनेक महिला बनारसीऐवजी कांजीवरम किंवा कांजीवरमऐवजी बनारसी खरेदी करतात. तुमच्याबाबतीत असं कधी घडू नये यासाठी बनारसी आणि कांजीवरम साड्यांमध्ये फरक कसा ओळखावा हे या लेखाद्वारे समजून घेऊया. जेणेकरून तुम्ही साड्यांची योग्य निवड कराल.

दोन्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेशीममध्ये फरक

कांजीवरम साडी शुद्ध रेशीम आणि जरीच्या धाग्यांपासून विणलेली असते. या साडीसाठी वापरलेले शुद्ध रेशीम साडीचे चमकदार पोत आणि जाडी तसेच टिकाऊपणा यासाठी ओळखल्या जातात. तर बनारसी साडी तयार करण्यासाठी मऊ रेशीम धागे आणि जरीच्या धाग्यांपासून बनवले जातात. दरम्यान बारीक रेशमी धागे बनारसी साड्यांना अतिशय नाजूक आणि गुळगुळीत पोत देतात.

हे सुद्धा वाचा

या दोन्ही साड्यांच्या विणकामात फरक

टिकाऊपणा लक्षात घेऊन कांजीवरम साड्या हाताने विणलेल्या जातात. साडी आणि साडीचे काठ वेगवेगळे विणल्या जातात आणि त्यानंतर दोन्ही भाग एकत्र जोडून संपूर्ण साडी तयार केली जाते, ज्यामुळे साडीचा पोत आणखी मजबूत होतो. तर दुसरीकडे ब्रोकेड पद्धतीचा वापर करून बनारसी साड्या तयार केल्या जातात. बनारसी साड्यांवर जाड, बुटी आणि बेल-बुटे इत्यादी डिझाइन्स बनवल्या जातात. त्यांचे बारीक काम त्यांना एक शाही स्वरूप देते.

दोन्ही साड्यांवर डिझाइन्स वेगवेगळे असतात

कांजीवरम साड्यांमध्ये सामान्यत: मोर, पोपट, चेक्स किंवा मंदिरांसारख्या पारंपारिक डिझाइनचा वापर केला जातो. यात बोल्ड आणि कॉन्ट्रास बॉर्डर्स आहेत ज्या साडीला रॉयल लुक देण्यास मदत करतात. दुसरीकडे बनारसी साड्यांमध्ये सामान्यत: फुलांच्या किंवा फोलिएटेड डिझाइनचा समावेश असतो, जे बहुतेक मुघल कलेपासून प्रेरित असतात. बनारसी साड्यांना नाजूक बॉर्डर्स असतात. ज्या साडीला शाही लुक देण्यास मदत करतात.

दोन्ही साड्या या वजन आणि कंफर्ट यात फरक

जाड रेशीम आणि जरीच्या कामामुळे कांजीवरम साड्या जड असतात. दक्षिण भारतातील वधू लग्नासाठी खास प्रसंगी कांजीवरम साड्या परिधान करणे पसंत करतात. साधारणपणे कांजीवरम साड्या खास प्रसंगांसाठीच स्टाईल केल्या जातात. दुसरीकडे, कांजीवरमच्या तुलनेत बनारसी साड्या वजनाने हलक्या असतात, ज्यामुळे त्या अधिक आरामदायक असून ते तुम्ही कोणत्याही प्रसंगी अगदी सहज परिधान करू शकतात.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक, दत्तात्रय गाडेला बेड्या
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक, दत्तात्रय गाडेला बेड्या.
पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’
पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’.
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी.
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर.
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध.
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा.
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल.
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ.
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?.
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.