पहिल्या नजरेतलं प्रेम खरंच असते का? डोक्यात नेमका काय होतो केमिकल लोचा ?
ऑक्सिटोसिन ज्याला 'लव्ह हार्मोन्स' असेही म्हटले जाते. मानवात भावनात्मक संबंध आणि सामाजिक संबंध वाढविण्यासाठी सहाय्यभूत ठरते. हे हार्मोन्स एखाद्या व्यक्तीला पाहून त्याच्याबद्दल प्रेम आणि विश्वास वाढविण्यास मदतगार ठरते. हे केवळ नात्यांना मजबूत बनवत नाही तर मेंदूला शांत आणि स्थिर करण्यासही मदत करते.
‘ती पाहतांच बाला, कलिजा खलास झाला, छातींत इष्कभाला, कीं आरपार गेला !’ असे आचार्य अत्रे यांचे एक गीत अजरामर आहे. परंतू पहिल्या नजरेतलं प्रेम खरोखरच असते का ? अनेक कविता, शेरो- शायरीत पहिल्या नजरेतल्या प्रेमाबद्दल लिहिलेले आहे. अखेर पहिल्या नजरेत कोणाला पाहून माणसाला प्रेम कसे काय होऊ शकते.? म्हणजे प्रेमाची सुरुवात डोळ्यापासूनच होते की काय ? काय आहे या मागचे विज्ञान हे आपण आज पाहूयात….
अनेक संशोधकांचे म्हणणे आहे की जेव्हा आपण एखाद्याला पाहातो तेव्हा ती व्यक्ती पाहून शरीरातून ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होत असतो. हे हार्मोन मानवी मेंदूत आणि शरीरात भावनात्मक आणि सामाजिक संबंध तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे या हार्मोन्सला ‘लव्ह हार्मोन’ किंवा कडल हार्मोन्स देखील म्हटले जाते. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहाता आणि तुम्हाला चांगले वाटते तेव्हा शरीरातून ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होते.
त्यानंतर ऑक्सिटोसिन हे हार्मोन्स मेंदूत अशा सकारात्मक भावना उत्पन्न करते की त्यातून परस्पर प्रेम आणि संबंध मजबूत होतात. अशाच प्रकारानेच एखाद्या व्यक्तीला पाहून ‘कलिजा खलास’ होतो आणि त्या व्यक्तीच्या प्रेमकहाणी अशा प्रकारे सुरु होत असते. या लेखात आपण ऑक्सीटोसिन हार्मोन्स म्हणजे काय ? आणि त्याबाबतचे अनेक प्रयोग पाहणार आहोत.
हार्मोन्समुळे विश्वास वाढतो
ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याबद्दलचा विश्वास वाढतो. हा हार्मोन्स व्यक्तीला प्रेमळ आणि संवेदनशील देखील बनवितो. ज्यामुळे तो दुसऱ्यांच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजतो. हा हार्मोन्स केवळ प्रेयसी आणि प्रियकरासाठी नाही तर आई-वडील आणि मुलांचे नाते, रोमांटिक पार्टनरशी संबंध, दोन मित्रांमधील केमिस्ट्री यातही महत्वाची भूमिका निभावत असतो.
ऑक्सिटोसिन हार्मोन्समुळे एकमेकांबद्दल विश्वास वाढतो. हा हार्मोन्स एखाद्या व्यक्तीला अक्षरश: सुधारत असतो. त्याला अधिक दानशूर आणि प्रेमळ बनवित असल्याने तो व्यक्ती दुसऱ्यांच्या् भावनांना चांगल्या प्रकारे समजतो. म्हणूनच तर म्हटले जाते की प्रेमात माणूस सुधारतो….
हे हार्मोन्स कुठून रिलीज होते ?
ऑक्सिटोसिन हार्मोन्स मानवी मेंदूतील हायपोथॅलेमस या केंद्रातून प्रसवते आणि पिट्युटरी ग्लॅडद्वारे शरीरात पसरते.एखाद्याची गळाभेट घेतल्याने, हात मिळविल्याने किंवा एखाद्या भावनिक संवाद साधल्याने ऑक्सीटोसिन हार्मोन रिलीज होते. हे हार्मोन्स इतके प्रभावी असते की तणावपूर्ण स्थितीतही ती व्यक्तीला शांत आणि स्थिर बनविते. हे हार्मोस मेंदूत आनंदी आणि समाधानाची भावना तयार करते.
हे हार्मोन्स भावनिक आणि सामाजिक संबंधाचा पाया आहे. एवढेच नाही अलिकडे झालेल्या संशोधनाचा विचार केला तर ऑक्सीटोसिन आणखी खूप काही करु शकते. ऑक्सीटोसिन ना केवळ काही शिकण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावते तर अनेक प्रकारच्या उपचारात देखील सहाय्य करू शकते.
ऑक्सीटोसिन हार्मोनचा प्रभाव
मानवी मेंदू आणि त्याचा व्यवहार समजण्यासाठी या ऑक्सिटोसिन हार्मोन्सवर एक अभ्यास केला गेला आहे. टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सचे संशोधक जुनपेई ताकाहाशी आणि प्रोफेसर अकियोशी साईतोश यांनी ऑक्सिटोसिन हार्मोन्सच्या मेंदूवर होणाऱ्या प्रभावाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या संशोधनाने मेंदूच्या स्मरणशक्तीवरील त्याचा प्रभाव सांगितलाच शिवाय डिमेंशिया या आजारात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो असेही म्हटले आहे.
उंदरांवर काय झाला प्रयोग ?
प्रोफेसर साईतोश आणि त्यांच्या टीमने उंदरांवर ऑक्सिटोसिनच्या परिणामांचा अभ्यास केला. मात्र, सामाजिक व्यवहारांवर ऑक्सीटोसिनच्या प्रभावाचा आधीच तपासला गेला आहे. परंतू मेंदूच्या कॉग्निटिव क्षमतांवर याच्या परिणामाच्या संदर्भात खूपच मर्यादित माहिती होती. ऑक्सीटोसिन मेंदूची स्मृतीक्षमता वाढविण्यासाठी किंवा कायम राखण्यासाठी मदत होते का ? हे तपासणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश्य होता. हे संशोधन मेंदूची क्षमता प्रभावित करणाऱ्या आजारांमध्ये उदा. डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या आजारासाठी महत्वाचे होते.
स्मरणशक्तीवर ऑक्सीटोसिनचा प्रभाव काय?
या संशोधनात अभ्यासकांनी उंदराच्या मेंदूतील काही भागातील ऑक्सिटोसिन- नियंत्रित न्यूरॉन्सना सक्रीय केले. त्यानंतर त्यांनी उंदराच्या वस्तू ओळखण्याच्या क्षमतेची तपासणी केली. आणि निष्कर्षात आढळले की ऑक्सिटोसिन न्यूरॉन्सला सक्रीय केल्याने मेंदूतील ते भाग देखील सक्रीय झाले जे स्मरणशक्ती आणि भावनात्मक प्रतिक्रीयांशी संलग्न होते. हा प्रभाव केवळ दीर्घकालिन स्मरणशक्तीवर आढळला गेला, तर अल्पकालिन स्मरणशक्तीवर याचा काहीही परिणाम झाला नाही.
डिमेंशिया आजारावर उपचार शक्य
डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या आजारांसाठी हा अभ्यास नवीन आशा निर्माण करणारा ठरला आहे. संशोधनात आढळले की ऑक्सीटोसिनच्या माध्यमातून मेंदूतील स्मरणशक्तीला प्रभावित केले जाऊ शकते. याशिवाय सामाजिक संपर्काची कमतरता आणि एकटेपणा सारखी स्थिती डिमेंशियाच्या लक्षणांना आणखी खराब करू शकते. प्रोफेसर साईतोश यांच्या मते ऑक्सीटोसिन या समस्यांना देखील दूर करण्यास मदत करु शकते.
व्यसनाधीनतेच्या उपचारातही महत्वाचे
ऑक्सीटोसिनचा उपयोग केवळ मेंदूच्या संबंधित आजारावरच नाही तर व्यसनाधीनतेच्या उपचारातही प्रभावी ठरू शकते. ऑक्सीटोसिनचा वापर ओपिओईड व्यसनांच्या उपचारातही केला जाऊ शकतो. ओपिओईड वेदनाशामक औषधातही वापरले जाते. मात्र, खूपकाळ जर याचा वापर केला जर त्याचे व्यसन किंवा सवय लागण्याचा धोका असतो असे मेरिडिथ बेरी यांनी म्हटले आहे. ऑक्सीटोसिन या औषधांचा नकारात्मक प्रभाव कमी करु शकते तसेच व्यसनाचा धोकाही नियंत्रित करु शकते.
ऑक्सीटोसिनचे महत्व
१ – ऑक्सिटोसिन हा मेंदूचा एक रासायनिक संदेशवाहक हार्मोन्स आहे जे शरीराच्या वेगवेगळ्या भागात कार्य करतो.
२ – बाळाचा जन्म आणि स्तनपान करताना देखील ऑक्सिटोसिन महत्त्वाचं असते.
३ – तुम्ही इतरांसोबत भावनिक संबंध कसे निर्माण करता यातही ते भूमिका बजावते.
४ – ऑक्सिटोसिन हे प्रसूतीच्या काळात गर्भाचे आकुंचन होण्यासाठी महत्वाचे आहे आणि काहीवेळा या उद्देशासाठी औषध म्हणून वापरले जाते.
५ – बाळाच्या जन्मानंतर जास्त रक्तस्त्राव रोखण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी देखील दिले जाते.
६ – पुरुषांमध्ये ऑक्सिटोसिन टेस्टोस्टेरॉन तयार करण्यात आणि शुक्राणूंच्या हालचालींमध्ये महत्वाचे असते.
ऑक्सिटोसिन म्हणजे काय?
ऑक्सिटोसिन हे मेंदूमध्ये तयार होणारे नैसर्गिक संप्रेरक ( हार्मोन्स ) आहे. हे पिट्यूटरी ग्रंथीद्वारे रक्तप्रवाहात साठवले जाते आणि शरीरात सोडले जाते.
ऑक्सिटोसिन स्त्री आणि पुरुष दोन्हींच्या प्रजनन प्रणालींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. प्रसूती आणि बाळाच्या जन्मासाठी आणि जन्मानंतर स्तनातून दूध सोडणे यांचा समावेश होतो.
हे तुमच्या मेंदूमध्ये एक रासायनिक संदेशवाहक म्हणून देखील कार्य करते. मानवाची सामाजिक ओळख, नातेसंबंध निर्मिती आणि दीर्घकालीन भावनिक संबंध यासारख्या मानवी वर्तनातील महत्त्वपूर्ण घटकांवर ऑक्सिटोसिन प्रभावी ठरते.
ऑक्सिटोसिनची भूमिका काय आहे?
ऑक्सिटोसिनची अनेक मानवी वर्तणूक आणि सामाजिक परस्परसंवादांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते
लैंगिक उत्तेजना
व्यक्तींना एकमेकांना ओळखण्यास मदत करते
परस्पर विश्वास वाढवते
संबंध आणि रोमँटिक नाते निर्माण करणे
पालक आणि मुल संबंधांना प्रोत्साहन देणे