तुमचा स्क्रीनींग टाईम किती आहे? सावध व्हा… त्वचेवरील ‘या’ दुष्परिणामांचा धोका वाढतोय

स्मार्टफोन व लॅपटॉपपासून निघत असलेल्या लाईटस्‌चे ब्लू रेडिएशन डोळे, त्वचेसाठी घातक असतात. आधुनिक युगात फोन तसेच लॅपटॉपचा वापर वाढल्याने त्याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसून येत असतो. या लेखातून त्वचेवर होणार्या दुष्परिणामांची माहिती जाणून घेणार आहोत.

तुमचा स्क्रीनींग टाईम किती आहे? सावध व्हा... त्वचेवरील ‘या’ दुष्परिणामांचा धोका वाढतोय
skin
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 1:21 PM

मुंबई :  सध्याच्या युगात स्मार्टफोन (Smartphone) हा आपल्या जगण्यातील अविभाज्य घटक झाला आहे. अनेक जण तर मोबाईलशिवाय एक मिनीटदेखील राहू शकत नाही. त्यातच आता लहान मुलांमध्येही मोबाईलची क्रेझ अधिक वाढत असल्याची धोकादायक बाब समोर येत आहे. याशिवाय अनेक लोक दिवसातून अनेक तास मोबाईल व लॅपटॉपचा वापर करीत असतात. कोरोना काळापासून तर या दोन्ही गोष्टी आपल्या अतिशय जवळ आलेल्या आहेत. हा अनेकांच्या कामाचा भाग असला तरी याचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येत असतात. मोबाईल व लॅपटॉपपासून निघणारे किरणे आपल्या डोळ्यांना गंभीर इजा पोहचवू शकतात. अनेक अभ्यासातून हे स्पष्ट झालेय, की मोबाईल व लॅपटॉपमधून निघणारे ब्लू रेडिएशन (Blue radiation) केवळ डोळ्यांनाच नव्हे तर, आपल्या त्वचेलाही (skin) नुकसानकारक आहेत. मोबाईल व लॅपटॉप सारख्या साधनांना एक एंटीना लावला गेलेला असतो, ज्याव्दारे एकमेकांशी संपर्क करणे सोपे होत असते. यातून निघणारे तरंग मानवी आरोग्यासाठी धोकेदायक असतात.

1) स्किन टोन

तज्ज्ञांच्या मते, ब्लू रेडिएशनमुळे स्किन टोनचे खूप मोठे नुकसान होत असते. ब्लू रेडिएशन त्वचेमध्ये गेल्यामुळे त्वचेचा रंग बदलणे, त्वचेला खाज सुटणे आदी समस्या निर्माण होउ शकतात. त्वचेला खाज सुटत असल्याने लोक शरीर जोराने खाजवायला सुरुवात करतात. यातून त्वचेला इजा होण्याचाही धोका निर्माण होउ शकतो. तसेच ब्लू रेडिएशनमुळे त्वचा कोरडी पडत असल्याने त्वचेवरील चमक जाते. अशात कमीत कमी वेळ मोबाईल व लॅपटॉपचा वापर करावा.

2) सुरकुत्यांची समस्या

ब्लू रेडिएशनमुळे त्वचेला खाज सुटणे तसेच त्वचा कोरडी पडण्यासोबत सुरकुत्यांची समस्यादेखील निर्माण होउ शकते. त्वचेवर ओरखड पडत असतात. मोबाईल व लॅपटॉपपासून निघणारी किरणे त्वचेच्या आतमध्ये जावून हानी पोहचवत असतात. त्यामुळे साहजिकच त्वचा निस्तेज होण्यास सुरुवात होते. तसेच अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेच्या आतील टिश्‍यूंना यापासून नुकसान पोहचण्याचा धोका असतो.

3) पिगमेंटेशन

ब्लू रेडिएशनमुळे त्वचा जळण्यास सुरुवात होते. यानंतर त्वचेवर हळूहळू पिगमेंटेशनची प्रक्रिया सुरु होते. यातून त्वचेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. सध्याच्या युगात आपण पूर्णत: मोबाईलसह अन्य साधनांना दूर करु शकत नसलो तरी, त्यांचा कमीत कमी वापर करणे आवश्‍यक आहे. या साधनांचा वापर करीत असताना काळी वेळाचा ब्रेक घेणे आवश्‍यक आहे.

इतर बातम्या

दररोज सकाळी जिमला जाण्याचा येतो कंटाळा? मग हे उपाय करा आणि घरीच आपले वजन कमी करा!

Skin Care : महागड्या उत्पादनांपेक्षा कोरफडचा अशाप्रकारे वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....