तुम्ही अंडी खाण्याचे शौकीन आहात? मग ही बातमी वाचा

दिवसाला एकापेक्षा अधिक अंडी खाणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. इतकच नाही तर हाय बीपी आणि हृदयासंदर्भात त्याचा धोका होऊ शकतो.

तुम्ही अंडी खाण्याचे शौकीन आहात? मग ही बातमी वाचा
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 10:17 AM

मुंबई: अंडी खाण्याचे फायदे डॉक्टरही आपल्याला सांगतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे अंडी आपल्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त ठरतात. पण अंडी खाताना तुम्ही करत असलेली चूक तुम्हाला चांगलीच महागातही पडू शकते! डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे रोज फक्त एक अंडं खाणं फायद्याचं आहे. तुम्ही नियमीत व्यायाम, रनिंग किंवा वॉकिंग करत नसाल तर दिवसभरात एकच अंड खा. (What should be taken care of while eating eggs every day?)

दिवसाला एकापेक्षा अधिक अंडी खाणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. इतकच नाही तर हाय बीपी आणि हृदयासंदर्भात त्याचा धोका होऊ शकतो.

अंडी चांगली शिजवून खा

अंडी चांगली शिजवून मगच खावीत. कारण अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचा एक बॅक्टेरिया आढळून येतो. हा बॅक्टेरिया कोंबडीपासून अंड्यांमध्ये येतो. त्यामुळे अंडं चांगल्याप्रकारे शिजवून खाल्लं नाही तर तुम्हाला अनेक आजारांना सामोरं जावं लागू शकतं. या बॅक्टेरियामुळे फूड पॉयझनिंगही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अंड्याचं ऑम्लेट किंवा अन्य कुठलाही प्रकार खात असाल तर ते चांगल्या रितीनं शिजवूनच खा.

नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ हार्ट ने दिलेल्या माहितीनुसार अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपल्या शरिरात कॅलरीजचं प्रमाणही वाढतं. ज्या लोकांना हाय बीपी, मधुमेह आणि हृदयासंदर्भात आजार आहेत त्यांनी अंड्यातील पिवळा बलक खाणं टाळलं पाहिजे. पिवळा बलक खाल्ल्याने अशा रुग्णांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

अंडी शिजवताना तापमान नियंत्रित ठेवा

अंडी शिजवताना त्याचं तापमान नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यातील अनेक पोषक घटक संपण्याची शक्यता असते. अंडी मायक्रोव्हेवमध्ये गरम करणं, फ्राय केल्यानं त्यातील पोषक तत्व कमी होतात.

तुम्हाला अंडी खाल्ल्यानंतर शरीर सुजने, उल्टी, खोकला, शिंक यांसारखे प्रकार होत असतील तर तुम्हाला अंड्याची अॅलर्जी आहे. अंड्यांमधील अल्ब्यूमिनमुळे असा प्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर अंडी खाल्ल्यानं शरिरातील बायोटीन नामक K व्हिटामीन कमी होतं. बायोटीनमुळे शरिरात विटामिन H आणि विटामिन B7चं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे केस गळणे आणि त्वचेसंदर्भातील अनेक आजार होऊ शकतात.

संबंधित बातम्या:

सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये होणार बदल, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम?

Lips Care | थंडीच्या दिवसांत अशाप्रकारे घ्या आपल्या नाजूक ओठांची काळजी!

What should be taken care of while eating eggs every day?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.