पांढरे केस चुकूनही तोडू नका त्याऐवजी ‘या’ उपायांचा अवलंब करा…

अकाली केसं पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. लहान वयातच केस पांढरे होऊ लागले तर साहजिकच त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. परंतु या समस्येवर नैसर्गिकरीत्या मात करण्याचे अनेक मार्ग आहेत.

पांढरे केस चुकूनही तोडू नका त्याऐवजी ‘या’ उपायांचा अवलंब करा...
white hair
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 11:27 AM

मुंबई : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक वेळा लोकांचे केस अगदी लहान वयातच पांढरे होऊ लागतात. याशिवाय जास्त ताण आणि खराब पाण्यामुळे वेळेआधीच डोक्यावर पांढरे केस (white hair) दिसू लागतात. पुरुषांसह महिलांनाही या समस्यांनी ग्रासलेले असते. काही वेळा तर अगदी शाळेत जात असलेल्या मुलांमध्येही ही समस्या दिसून येत असते. अनेकदा पांढरे केस आलेत की आपण आपल्या पध्दतीने त्यावर उपाय योजना करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु यातून अनेकदा समस्या कमी होण्याएवजी वाढण्याचा धोका अधिक असतो. विशेषत: जे पांढरे केस रंगवतात. किंवा त्यांना तोडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासमोर अनेक समस्या (Problem) निर्माण होत असतात.

पांढरे केस दिसल्यावर काय करावे?

पांढरे केस पाहून तणावात येण्याची अजिबात गरज नाही, काही उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. जर तुमचे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागले असतील तर केस तोडण्याची चूक करू नका. त्यामुळे पांढरे केस आणखी वाढू शकतात.

कॅफिनचे सेवन कमी करायचे?

जेव्हा केस पांढरे होऊ लागतात तेव्हा कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन कमी करा. याशिवाय फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असलेल्या गोष्टी खा. ग्रीन टीचा आहारात समावेश करावा.

मेहंदी वापरा

पांढरे केस टाळण्यासाठी मेहंदीचा वापर करा. हे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक देण्याचे काम करते. ते नियमितपणे लावल्याने तुमचे केस चमकदार होतात.

ऑईल बेस्ड रंग वापरा

पांढऱ्या केसांना रंग दिल्याने त्यांचा नैसर्गिक रंग निघून जातो. केसांचा रंग निवडताना ऑईल बेस्ड रंग असावा हे लक्षात ठेवा. त्यामुळे केसांचे कुठलेही नुकसान होणार नाही, शिवाय तुमच्या केसांना चमक प्राप्त होईल.

(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीवर आधारीत आहे. याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

होळीमध्ये गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

Skin Care : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अ‍ॅलर्जी होते? मग हे 5 उपाय नक्कीच कामी येतील!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.