भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत खूप खास, उन्हाळ्याच्या सुट्टीत करा एक्सप्लोर
बहुतेक लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात सुट्ट्या असतात. चांगल्या ठिकाणी जाऊन त्या सुट्ट्यांचा आनंद घ्या. म्हणूनच, आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अतिशय सुंदर पद्धतीने घालवू शकता.

Travel in Summer : सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. त्यामुळे या हंगामात प्रत्येकाला कुठे ना कुठे जावेसे वाटते. त्यातच आता मुलांच्या परिक्षा संपणार आहे. तर अशावेळेस अनेकजण कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तसेच आपल्या भारतात प्रत्येक ऋतूमध्ये पर्यटक भेट देण्याची ठिकाणे बदलतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना हिल्स स्टेशन किंवा डोंगराळ ठिकाणी जायला आवडते. जर तुम्ही सुद्धा कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. तुम्हाला उन्हाळ्यात बर्फ पहायचा असेल तर डोंगराळ भागात जा. कारण कडक उन्हाळ्याच्या दिवसात आराम करण्यासाठी व थंड आणि आरामदायी ठिकाणी जावेसे वाटते. यासाठी तुम्हाला आम्ही या उन्हाळ्यात भेट देण्यासाठी काही अद्भुत ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात…
मुन्नार
मुन्नार हे केरळमधील एक हिल स्टेशन आहे, जे इडुक्की जिल्ह्यात येते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. रोजच्या धावपळीपासून आणि प्रदूषणापासून दूर, हे ठिकाण लोकांना आकर्षित करते. 12000 हेक्टरवर पसरलेले सुंदर चहाचे बाग हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय येथे वन्यजीव जवळून पाहता येतात.
रानीखेत
उन्हाळ्यात उत्तराखंडला भेट देण्यासाठी दूरदूरहून पर्यटक येतात. धार्मिक स्थळ असल्याने, बहुतेक लोक येथे गंगा स्नान करण्यासाठी येतात. उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रानीखेत हे एक हिल स्टेशन खूप प्रसिद्ध आहे. हे छोटे शहर सौंदर्याने भरलेले आहे. या शहराचे शांत वातावरण, फुलांनी झाकलेले रस्ते, देवदार आणि पाइनचे उंच झाडं हे पर्यटकांना आकर्षित करतात.




लडाख
लडाख हे भारतातील असे एक ठिकाण आहे जिथे वर्षभर पर्यटक येतात. हिवाळ्यात, संपूर्ण परिसर बर्फाने झाकलेला असतो परंतु जून-जुलैमध्ये क्वचितच बर्फ पडतो परंतु येथील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. लडाखमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला स्वर्गात फिरल्यासारखे वाटेल. लडाख त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. जर तुम्हाला उन्हाळ्यात एखाद्या ठिकाणी भेट द्यायची असेल तर तुम्ही इथे अवश्य द्या.