शरीराच्या कोणत्या अवयवार पहिलं अटॅक करतो हा HMPV;शरीरात काय बदल होऊ लागतात

HMPV हा एक वेगाने पसरणारा विषाणू आहे ज्याची चर्चा सध्या देशभरात होताना दिसतेय.

शरीराच्या कोणत्या अवयवार पहिलं अटॅक करतो हा HMPV;शरीरात काय बदल होऊ लागतात
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 6:14 PM

सध्या भारतात करोनासारखं टेन्शन पुन्हा एकदा आलं आहे. ज्याची चर्चा आणि प्रसार होताना दिसत आहे. तो म्हणजे HMPV. HMPV हा विषाणू आहे वेगाने पसरत आहे आणि लोकांना संक्रमित करत आहे. हा धोकादायक संसर्ग प्रथम शरीराच्या कोणत्या अवयवावर हल्ला करतो.

कोविड-19 नंतर ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV)

कोविड-19 नंतर ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हळूहळू जगातील इतर देशांमध्ये पसरत आहे. भारतात आतापर्यंत या विषाणूचे 5 रुग्ण आढळले आहेत. बेंगळुरू, अहमदाबाद आणि तामिळनाडू तेसच नागपूर विविध भागांतून रुग्ण आढळून आले आल्याचं म्हटलं जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम करतो आणि त्याची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असू शकतात. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये यामुळे गंभीर संसर्ग लवकर आणि झपाट्याने होत असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या असून करोनासारखी गंभीर परिस्थिती उद्भवू नये याची काळजी घेतली जात आहे. तसेच या आजारासाठी नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल अजून हवं तेवढी जागृकता आली नाहीये. आधी तर हे जाणून घेऊयात की,हा विषाणू सर्वात पहिले शरीराच्या कोणत्या भागावर आक्रमण करतो.

HMPV कोणत्या भागावर पहिले आक्रमण करतो?

HMPV हा विषाणू प्रथम फुफ्फुस आणि वायुमार्गांना लक्ष्य करतो. या संसर्गामुळे श्वसन प्रणालीच्या पेशींना नुकसान होते, ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते, खोकला आणि इतर समस्या निर्माण होतात. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये, लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरतो आणि त्यामुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात.

हा आजार झाल्यास शरीरात कोणते बदल जाणवू लागतात?

संसर्गामुळे श्वसन प्रणालीच्या पेशींना नुकसान होत असल्याने श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात. हा विषाणू श्वसन प्रणालीवर परिणाम करतो ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असू शकते. शरीरात अशक्तपणा जाणवतो.

घसा खवखवणे आणि कफ

HMPV घशावर देखील परिणाम करते, ज्यामुळे घसा खवखवणे, कोरडा खोकला आणि कफ होतो. विषाणू जसजसा शरीरात वेगाने पसरतो तसतसे ब्राँकायटिस, न्यूमोनिया आणि वायुमार्गात अडथळा यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

शरीरात ऑक्सिजनची कमतरता: एवढंच नाही तर शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. ज्यामुळे हायपोक्सिया होण्याची शक्यता असते.

काळजी कशी घ्यावी?

तज्ज्ञांच्या मते, एचएमपीव्हीपासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. गर्दीची ठिकाणी जाणे टाळणे, मास्क वापरणे, मुख्य म्हणजे आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे. लहान मुले आणि वृद्धांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

सरकार आणि डॉक्टरांचा सल्ला

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की संक्रमित मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी इतर कोणत्याही देशात अलीकडे प्रवास केल्याची नोंद नाही. डॉक्टरांनी लोकांना आवाहन केले आहे की, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

तसंच आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसारच रूग्णांनी योग्य ते उपचार घ्यावेत. घराबाहेर पडू नये, जेणेकरून दुसऱ्यांना संसर्गाचा त्रास होईल.

(डिस्क्लेमर: ही माहिती उपलब्ध स्त्रोतांवरून दिलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. तसेच कोणतेही लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता किंवा कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या)

पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.