कोण म्हणतं सॉरी म्हटल्यानं प्रश्‍न संपतात… तुमच्या नात्यावर असा होईल दुष्परिणाम

अस म्हटलं जातं वाद टाळायचे असल्यास एकाने माघार घ्यावी व सॉरी म्हणून प्रश्‍न मिटवावा. परंतु काही बाबतींमध्ये हे खरे असले तरी वारंवार आपल्या जोडीदाराला सॉरी म्हणणेदेखील तुमच्या रिलेशनशिपवर वाईट परिणाम पाडू शकते. आम्ही या लेखात काही अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे नाते अधिक घट्ट बनवू शकतात.

कोण म्हणतं सॉरी म्हटल्यानं प्रश्‍न संपतात... तुमच्या नात्यावर असा होईल दुष्परिणाम
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 11:03 AM

मुंबईः नातं (relationship) घट्ट करण्यासाठी त्यात, प्रेम, विश्‍वास त्यासोबतच एकमेकांविषयी आदर असणे आवश्‍यक असते. तेच नातं दिर्घकाळ टिकत असतं. परंतु अनेक नात्यांमध्ये या गोष्टींची कमतरता असते. बर्याच नात्यांमध्ये काही लोकांचा मुळ स्वभाव हा दुसर्याला डॉमिनेट (Dominate) करण्याचा असतो. अशी लोक आपल्या जोडीदाराला कुठल्या ना कुठल्या मुद्यांवरुन दबावात ठेवत असतात. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होत असतो. सतत तणाव झेलत असलेला जोडीदार (Spouse) मानसिक विकारांचा बळी ठरत असतो. अशाही परिस्थितीमध्ये बरेच लोक आपला आत्मसन्मान बाजूला ठेवून नाते टिकवण्याच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे अशी लोक छोट्या छोट्या गोष्टींवरही आपल्या पार्टनरला सॉरी म्हणून वेळ मारुन नेत असतात. परंतु अशी सवय ही सॉरी म्हणणार्या व्यक्तीच्या वळणी पडून याचे नात्यावर दुष्परिणाम दिसून येत असतात.

असा घेतला जातो गैरफायदा

आपण वारंवार सॉरी म्हणून नाते टिकवण्याच्या प्रयत्नात असतो, परंतु या तुमच्या चांगूलपणाचा तुमचा पार्टनर फायदा घेउ शकतो. वारंवार सॉरी म्हटल्यामुळे तुमचा पार्टनर सतत तुम्हाला दबावात ठेवू शकतो, त्याचे तुमच्यावर रागावणे, भांडण करणे आदी अजून वाढीस लागण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे कुठलेही ठोस कारण असल्याशिवाय सॉरी म्हणणे टाळावे.

…तर सॉरी म्हणू नका

नातं टिकाव म्हणून अनेक जण रिलेशनशिपमध्ये माघार घेत कारण नसताना वारंवार सॉरी म्हणत असतात. परंतु यामुळे तुमची समस्या कमी होण्यापेक्षा अधिक वाढीस लागू शकते. काही तरी ठोस किंवा वास्तविक कारण असल्याशिवाय सॉरी म्हणणे टाळले पाहिजे. तुम्ही वारंवार सॉरी म्हटल्याने तुमचा जोडीदार त्याची चुक असूनही ती तुमच्या माथी मारेल व तुमच्याकडून सॉरी म्हणण्याची अपेक्षा करु शकतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाच सॉरीचा वापर करावा

यामुळे नात्यात अधिक गुंतागुंत वाढेल

अनेक लोक भांडण तंटा नको म्हणून सॉरी म्हणून वाद मिटवण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु याचा नंतर नात्यावर खूप वाईट परिणाम होत असतो. लोकांना वाटत की सॉरी म्हटल्यावर प्रश्‍न मिटतो. परंतु तसे न होता तुमचे नाते अधिक गुंतागुंतीचे होत असते. तुमचे एक सॉरी नात्यातील तुमचे महत्व कमी करुन तुमच्या पार्टनरचा गर्व अधिक वाढवू शकते. यामुळे भविष्यात नात्यात अनेक तणाव निर्माण होउ शकतात.

अशी सांभाळा परिस्थिती

ज्या प्रमाणे नात्यात वारंवार सॉरी म्हणणे चुकीचे आहे, त्याच प्रमाणे नात्यात आपला ‘इगो’ आणणे हेदेखील नात्यांसाठी तितकेच धोकेदायक आहे. भांडण झाल्यावर जोडीदारांनी एकमेकांना थोडी स्पेस दिली पाहिजे. आपले म्हणणे काय आहे, हे आपल्या पार्टनरला व्यवस्थीत समजावून सांगा. जास्तीत जास्त संवाद साधा. नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी एकमेकांना समजून घ्या.

संबंधित बातम्या

Ajit Pawar: मार्केटमधून वीज खरेदी करणार, पण भारनियमन होऊ देणार नाही, अजित पवार यांची ग्वाही

बायकोचं मित्राशी अफेअर, त्याचंच मुल पोटात, थेट घटस्फोट मागितला, दिनेश कार्तिकची मुळासकट हलवून सोडणारी स्टोरी

Maharashtra MP: खासदारांना निधी खर्चाचे वावडे; प्रीतम मुंडेंनी भोपळाही नाही फोडला, जळगावच्या पाटलांची बाजी

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.