कधी विचार केलाय का पुस्तकांचा आकार गोल किंवा त्रिकोणी का नसतो? कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है…

| Updated on: Apr 09, 2025 | 11:53 AM

तुम्ही आतापर्यंत पुस्तकांचा आकार हा एकसारखाच पाहिला असेल. उभ्या, चौकोनी, आयताकृती आकाराची पुस्तके...पण पुस्तकांच्या या आकाराचा कोणता नियम आहे? की कोणती परंपरा? किंवा असे काय कारण असेल की पुस्तकांना आकार पूर्वीपासून तसाच आहे... याचा तुम्ही कधी विचार केलाय? आजकाल मोबाईल फोन्स, कारचे मॉडेल्स आणि रोजच्या वापरातील सर्वच वस्तुंच्या डिझाईनचे रोज एक्सपेरिमेंट केले जात असताना पुस्तकांबाबत आपण इतके गंभीर का?

कधी विचार केलाय का पुस्तकांचा आकार गोल किंवा त्रिकोणी का नसतो? कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है...
books
Follow us on

तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी कोणती ना कोणती पुस्तके वाचली असतीलच. त्यातील काही पुस्तके ही कंटाळवाणे तर काही हृदयाला स्पर्श करून गेली असतील. या सगळ्यामध्ये तुमच्या मनात कधी एक प्रश्न आलाय का? की पुस्तकांचा आकार हा एकसारखाच का असतो? पुस्तकं कधी गोल किंवा त्रिकोणी किंवा इतर कोणत्याच आकाराची का नसतात? आजकाल प्रत्येक गोष्टीत इतकी क्रिएटिव्ही वापरली जाते मग पुस्तकांचा आकार पूर्वीपासून तसाच का? चला जाणून घेऊया याचे खरे कारण नेमके काय…

व्यावहारिक डिझाइन

पुस्तकाचा आकार उभा किंवा आयताकृती असल्याने ते कपाटात ठेवणे, बॅगेमध्ये रोज कॅरी करणे किंवा एकावर एकवर ठेवणे सोयिस्कर पडते. पुस्तके गोल किंवा त्रिकोणी आकाराचे असले असते तर त्यांना सांभाळणे, कॅरी करणे थोडेसे कठीणच झाले असते. जरा कल्पना करा की पुस्तके गोलाकार असती तर ती पुस्तके बॅगेमध्ये कशी राहिली असती? जर पुस्तके त्रिकोणी असती तर त्या पुस्तकांचे कोपरे वाकले असते आणि लायब्ररीत पुस्तके ठेवायला जागा नसती तर काय झाले असते?

छपाईचे वैज्ञानिक कारण

छपाई मशिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्याला पेपर शीट्सचा आकार हा आयताकृतीच असतो. या पेपर्सना पुस्तकाच्या स्वरूपात कापून त्यांना दुमडण्याचा सर्वात सोयीस्कर आणि पेपर कमी वाया जाण्यासाठीची पद्धत देखील आयताकृती पेपरमुळेच शक्य आहे तर गोलाकार किंवा त्रिकोणी पुस्तके तयार करणे म्हणजे जास्त वेळ खर्च आणि पेपर शीट्सचे जास्तीत-जास्त नुकसान होण्यासारखं आहे.

वाचनासाठी आकारही सोयिस्कर हवा

जेव्हा तुम्ही पुस्तक उघडता तेव्हा तुमचे डोळे डावीकडून उजवीकडे आणि वरपासून खालपर्यंत असेच जातात. या वाचन पद्धतीसाठी आयताकृती पाने असणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. गोलाकार पानांवर मजकूर बसवणे आणि त्रिकोणी पानांवर मजकूर छापणे म्हणजे पानांवरची जागा वाया जाण्यासारखेच आहे.

प्राचीन काळी, लोक स्क्रोलवर आदेश (लांब पेपर रोल) लिहीत असत, परंतु हा आदेश वाचणे फार कठीण होते, रोल पुन्हा पुन्हा उघडावा लागायचा. पण जेव्हा पुस्तकांचा शोध लागला तेव्हा आयताकृती स्वरूप सर्वात सोयीस्कर वाटले आणि हळुहळू हे स्वरूप सवयीचे झाले आणि आजही ते तसेच आहे.

प्रोडक्शनपासून ते डिझाईनपर्यंत

पुस्तके फक्त वाचायची नसतात तर त्यांचे डिझाईन करावे लागते, त्यांना छापावे लागते. छापून झाल्यानंतर ते बांधून विक्रेत्यांकडे पाठवायची असतात. ही संपूर्ण प्रक्रिया चौरस, आयताकार आकारात सर्वात सोपी आणि स्वस्त असते. हा आकार प्रकाशकांसाठी देखील सर्वात कॉस्ट-इफेक्टिव्ह असा असतो