विमानात आपोआप नारळ फुटतो? विमान प्रवासात नारळ घेऊ जाणे इकते धोकादायक असू शकते…

विमानाने प्रवास करताना नारळ घेऊन जाण्यास बंदी का असते. कधी विचार केलाय का? नारळामुळे असे काय नुकसान होऊ शकते की ज्यामुळे एक नारळ विमानात घेऊ जाणे इतके धोकादायक असू शकते? पाहुयात नेमकं काय कारण आहे.

विमानात आपोआप नारळ फुटतो? विमान प्रवासात नारळ घेऊ जाणे इकते धोकादायक असू शकते...
Why are Coconuts Banned on Flights
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 6:30 PM

विमानाने प्रवास करताना काळजी घ्यावी लागते ती वस्तूंची, म्हणजे कोणत्या वस्तू नेल्या तर चालतात आणि कोणत्या नाही. त्याबाबत विमानप्रवासाचे नियम खूपच कडक असतात. जसं की, लायटर, ड्राय सेल बॅटरीसारख्या ज्वलनशील वस्तू, चाकूसारख्या तीक्ष्ण वस्तू, यात नारळ ही वस्तूदेखील तुम्हाला घेऊन जाण्यास बंदी असते. बाकीच्या वस्तूंचे ठिक आहे पण नारळ? हे एकूण नक्कीच आश्चर्य वाटतं. यामागील कारण नमेकं काय? जाणून घेऊयात

आपण विमान प्रवास करतो तेव्हा अनेक सूचना आपल्याला दिल्या जातात. वस्तूंमध्ये नारळ का घेऊन जाऊ दिला जात नाही असा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे. तर याबद्दल ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने एव्हिएशन ट्रेनिंग इंडियाचे एव्हिएशनतज्ज्ञ राजगोपाल आणि राजौरी गार्डन, नवी दिल्ली येथील कॉस्मेटिक स्किन क्लिनिकच्या अस्थेटीक फिजीशिअन आणि कॉस्मेटिलॉजिस्ट डॉक्टर करुणा मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. तेव्हा याबाबत अनेक खुलासे समोर आले.

नारळाचा शस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकतो

तज्ज्ञ राजगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, “सुकलेल्या नारळाचा आकार, वजन विमान प्रवासात एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर केला जाऊ शकतो किंवा विमानाचे नुकसानही करू शकतो. तसेच प्रवाशांना यामुळे इजादेखील होऊ शकते. विमानातील सर्व जण सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी एअरलाइन्सने कठोर धोरणे लागू केली आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शस्त्र म्हणून काम करू शकणाऱ्या वस्तूंना सहसा विमानात नेण्यास बंदी घातली जाते”

विमानात हवेच्या दाबामुळे नारळ फुटण्याचा धोका

डॉक्टर करुणा मल्होत्रा यांनी याबाबत सांगितलं की, “नारळाचे कवच कठीण असते आणि आत द्रव म्हणजे लिक्विड असतं. विमान आकाशात उंचावर गेल्यावर हवेचा दाब बदलल्यामुळे नारळ फुटण्याचा धोका असतो, ज्यामुळे विमान प्रवासात गोंधळ निर्माण होऊ शकतो किंवा प्रवाशांना इजाही होण्याची शक्यता असते त्यामुळे सुरक्षेच्या समस्या निर्माण होऊ शकते”

तसेचच जर नारळातून पाणी गळत असेल तर विमानाच्या आतील हवा दमट होऊ शकते, ज्यामुळे प्रवाशांना अस्वस्थता जाणवू शकते. यामुळे विमानाच्या यांत्रिकीसाठीही अडचणी येऊ शकतात.तसेच एअरपोर्टवर लिक्विड पदार्थ घेऊन येण्यासाठीचे कडक नियम आहेत. सुकलेल्या नारळातला द्रव पदार्थ १०० मिलिलिटरच्या मर्यादेपेक्षा जास्त असतो. त्यामुळे तो सामानातून आणण्यास बंदी आहे असल्याचे डॉ. राजगोपाल यांनी सांगितलं.

नारळामध्ये वस्तू लपवून घेऊन जाण्याचा धोका

तपासणीदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना एक्स-रे मशीनचा वापर करून नारळ स्कॅन करणे कठीण वाटू शकते. कारण सुकलेल्या नारळाच्या वरील कठीण कवच,आतले लिक्विड सामग्री लपवून ठेवू शकते आणि संशय निर्माण होणारी ही परिस्थिती बनू शकते. असंही राजगोपाल यांनी सांगितलं

तर, या सर्व निर्बंधांमुळे विमान प्रवास करताना नारळ घेऊन जाण्यास परवानगी देत ​​नाहीत. काही फ्लाइट्समध्ये जरी परवानगी दिली जात असली तरीही त्यांना फक्त चेक-इन लगेजमध्येच परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळे एअरलाइनचे नियम आधीच तपासणे कधीही चांगले असल्याचे डॉक्टर मल्होत्रा ​​यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.