World Ozone Day 2022: दरवर्षी का साजरा केला जातो ‘ जागतिक ओझोन दिवस ‘? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्व

World Ozone Day 2022: ओझोनच्या थराची गरज काय आहे, हे लोकांना कळावे, त्याबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. ओझोनचा थर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपले रक्षण करतो.

World Ozone Day 2022: दरवर्षी का साजरा केला जातो ' जागतिक ओझोन दिवस '? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्व
जागतिक ओझोन दिवसImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 12:24 PM

World Ozone Day 2022: पर्यावरणाचे (environment) रक्षण करणे व त्याची योग्य प्रकारे निगा राखणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही ओझोनच्या थराबद्दल (Ozone Layer) बरंच काही ऐकलं असेल. ओझोनच्या थराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी ‘ जागतिक ओझोन दिवस ‘ साजरा (World Ozone Day) केला जातो.

युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रॅम (UNEP) नुसार, काळ जसजसा पुढे जात आहे, त्यासह चांगला ओझोन म्हणजे स्ट्रॅटोस्फेरिक ओझोनची हानी होत आहे. पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्याच्या (sun rays) हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून ओझोनचा थर सर्वांचे रक्षण करतो. ओझोन दिवसाचे महत्व आणि इतिहास काय आहे, याबद्दल जाणून घेऊया.

जागतिक ओझोन दिवसाचा इतिहास ?

ओझोनच्या थराबद्दल लोकांना माहिती देणे आणि खराब झालेल्या ओझोन थराची जाणीव करून देणे हा जागतिक ओझोन दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. लोकांनी प्रदूषण कमी केले तर ओझोनच्या थराचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

ओझोन थराचे संवर्धन व्हावे यासाठी 19 डिसेंबर 1964 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सभेने, ‘ 16 सप्टेंबर’ हा दिवस ‘ जागतिक ओझोन दिन ‘ म्हणून घोषित केला. 1964 सालापासून दरवर्षी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो.

ओझोन थर म्हणजे काय ?

ओझोन थरामुळे पृथ्वी आणि त्यावर राहणाऱ्या सर्व जीवांचे हानिकारक किरणांपासून संरक्षण होते. वाढते प्रदूषण, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या घटकांचा वाढता वापर, सर्रास कापली जाणारी झाडे यामुळे पृथ्वीच्या वातावरणात असलेल्या ओझोन थराचे नुकसान होत आहे, तो खराब होत आहे.

ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे अनेक आजार होऊ शकतात आणि समस्या उद्भवू शकतात, ज्या केवळ ओझोन थरामुळेच रोखता येतात.

ओझोन दिवस साजरा का करावा ? काय आहे महत्व ?

ओझोन थराची बिकट स्थिती पाहता ओझोन थराबद्दलची माहिती लोकांना देऊन त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ओझोन दिन साजरा करणे अत्यंत महत्वाचे आहे.

दरवर्षी ओझोन दिनाच्या दिवशी लोकांना क्लोरोफ्लुरोकार्बन, प्लास्टिक आणि पर्यावरणासाठी हानिकारक ठरणाऱ्यया सर्व पदार्थांचा वापर कमी करून जास्तीत जास्त झाडे लावण्याचा सल्ला दिला जातो.

काय आहे यावर्षीची ओझोन दिनाची थीम ?

“मॉंट्रिअल प्रोटोकॉल” @35 (Montreal Protocol@35 : global cooperation protecting life on earth) ही या वर्षीची थीम आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.