समोसा त्रिकोणीच का असतो? दुसऱ्या आकारात का बनवला जात नाही?
समोसा हा सर्वांचाच आवडता पदार्थ असतो. पण कधी असा विचार केलाय का की समोसा नेहमी त्रिकोणी आकाराचाच का असतो? तो कधी दुसऱ्या आकारात का बनवला जात नाही? उत्तर फारच इंट्रेस्टींग आहे.
समोसा म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. अगदी मुंबईपर्यंत अनेक राज्यांमध्ये हा पदार्थ अगदी सहज मिळतो आणि आवडीने खाल्ला जातो. फक्त काही ठिकाणी त्याची चव आणि रेसिपी वेगळी असू शकते. जसं की काही ठिकाणी समोसामध्ये बटाटा टाकतात तर काही ठिकाणी बटाटासोबत वाटाणाही टाकतात, काही ठिकाणी समोसाची चव थोडीशी गोडसर असते तर काही ठिकाणी अदीच फिकी. पण समोसाच्याबाबतीत एक गोष्ट मात्र सर्वत्र सारखीच असते ती कधीच बदलली जात नाही. ती गोष्ट म्हणजे समोस्याचा आकार.
समोसाची एक गोष्ट जी कधीच बदलत नाही
समोसा कुठेही खा पण त्याचा आकार मात्र बदलत नाही. मुळात समोसाची ओळखच त्याचा त्रिकोणी आकार आहे. कुठेही गेलात तरी समोसा तुम्हाला त्रिकोणी आकाराचाच मिळतो. पण तुम्ही कधी असा विचार केलाय किंवा समोसा खाताना असा कधी विचार आलाय का? की समोरा हा त्रिकोणीच बनवला जातो. दुसऱ्या कोणत्या आकाराच का बरं नाही बनवला जातं. आणि जर आकार बदलला तर काय होईल, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
समोसा भारतात कसा आला?
समोसा हा भारतातील एक लोकप्रिय नाश्ता आहे. समोसा हा इराणी किंवा मध्यपूर्वेतील व्यापाऱ्यांनी भारतात आणला. समोसाचा शोध भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात लागला असं बहुतेक इतिहासकारांचं मत आहे. समोसाचा उगम मध्य आशियात झाला असं मानलं जातं, जिथे तो ‘सामसा’ म्हणून ओळखला जात असे. पण पुढे अपभ्रंश होऊन त्याचं नाव समोसा असं पडलं.
असाच एक पदार्थ इराणमध्ये सापडला. त्याचे पर्शियनमध्ये नाव ‘संबुशाक’ (संबुसाक) होतं, जे भारतात आल्यावर समोसा बनलं. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये समोसाला सिंघडा म्हणतात.
समोसाचा आकार त्रिकोणीच का असतो?
समोसाचा आकार हा त्रिकोणीच असतो. त्रिकोणी आकारामुळे समोसाचे आवरण मजबूत किंवा घट्ट राहते. त्यामुळे त्यात भरलेलं सारण असतं ते व्यवस्थित त्या आकारात सेट होतं.
मुळात या आकाराने डीप फ्राय करताना तो फुटत नाही. पण जर समोसा गोल बनवला आणि त्यात सारण जास्त झाल तर, आवरण फुटण्याची भीती असते. डीप फ्राय करताना समोसा फुटू शकतो. म्हणून तो त्रिकोणी आकारातच बनवला जातो. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला समोसा एकाच आकाराचा मिळेल आणि तो का हे तर आता तुम्हाला समजल असेलच.