World Chocolate Day: जाणून घ्या का साजरा केला जातो ‘ वर्ल्ड चॉकलेट डे’? काय आहे चॉकलेटचे महत्व ? आरोग्यासाठीही असते फायदेशीर
लहान मुलं असोत वा मोठी माणसं, चॉकलेट तर सर्वांनाच आवडतं. चॉकलेट न आवडणारी व्यक्ती विरळाच. चॉकलेटप्रेमींना ते खाण्यासाठी काही विशेष दिवसाची किंवा प्रसंगाची गरज नसते. फक्त खायला नव्हे तर इतरांना गिफ्ट देण्यासाठीही चॉकलेटलाच सर्वाधिक पसंती असते. एवढेच नव्हे तर अनेक लोक वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चॉकलेट (Chocolate) घालून त्यांची क्रेव्हिंग पूर्ण करतात. चॉकलेटबद्दलचे लोकांचे हे प्रेम पाहून […]
लहान मुलं असोत वा मोठी माणसं, चॉकलेट तर सर्वांनाच आवडतं. चॉकलेट न आवडणारी व्यक्ती विरळाच. चॉकलेटप्रेमींना ते खाण्यासाठी काही विशेष दिवसाची किंवा प्रसंगाची गरज नसते. फक्त खायला नव्हे तर इतरांना गिफ्ट देण्यासाठीही चॉकलेटलाच सर्वाधिक पसंती असते. एवढेच नव्हे तर अनेक लोक वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चॉकलेट (Chocolate) घालून त्यांची क्रेव्हिंग पूर्ण करतात. चॉकलेटबद्दलचे लोकांचे हे प्रेम पाहून दरवर्षी 7 जुलै ‘ वर्ल्ड चॉकलेट डे’ (World Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात पहिला चॉकलेट डे 2009 साली साजरा करण्यात आला होता. 1550 मध्ये याच दिवशी युरोपमध्ये चॉकलेटची सुरुवात झाली होती, असं मानतात. चॉकलेट डे साजरा करण्यासाठी, लोक या दिवशी फक्त चॉकलेट खातात, त्याशिवाय मित्र-मैत्रिणी आणि प्रिय व्यक्तींनाही चॉकलेट गिफ्ट देतात. चॉकलेटला ॲंटीऑक्सीडेंट्सचा उत्तम स्त्रोत मानलं जातं. आरोग्यासाठीही (Health) ते खूप उपयुक्त मानलं जातं. चॉकलेटचे आणखी काय फायदे आहेत, जाणून घेऊया.
चॉकलेटमुळे ताण कमी होतो
कोकोमध्ये असलेल्या ॲंटीऑक्सीडेंट्समुळे तणाव कमी होण्यास मदत होते. चॉकलेट खाल्ल्यामुळे स्ट्रेस, तणाव वाढवणारे हार्माोन्स नियंत्रणात राहतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे आपला मूड सुधारतो आणि लवकर स्ट्रेस येत नाही.
रक्ताभिसरण सुधारते
चॉकलेटमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. चॉकलेटमधील फ्लेवेनॉल्स रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखतं, असं म्हणतात. त्यामुळे शरीरातील ब्लड-फ्लो सुधारतो.
वजन कमी करण्यास मदत करते
तुम्हाल जर कोणी सांगितलं की चॉकलेट खाल्याने वजन कमी होतं, तर तुम्हाला पटेल का ? नाही ना. पण हे खरं आहे. वजन वाढेल, म्हणून चॉकलेटपासून दूर रहात असाल, तर तसं बिलकूल करू नका. अनेक अभ्यासांतून हा निष्कर्ष समोर आला आहे की, चॉकलेट खाणा-यांचा बॉडी मास इंडेक्स हा चॉकलेट न खाणा-यांच्या तुलनेत कमी असतो.
हृदयासाठीही चांगले असते चॉकलेट
चॉकलेटमुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
सुरकुत्या दूर ठेवण्यास उपयोगी
जर तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत तरूण दिसायची इच्छा असेल तर चॉकलेटचे नियमित सेवन करा. असे म्हणतात की चॉकलेट खाल्यामुळे चेहेऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत होते आणि त्वचा फ्रेश दिसते. त्यामुळे सुरकुत्या नको असतील तर नेहमी चॉकलेट खावे.