मकरसंक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या…

मुंबई : देशात संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशातील अनेक शहरात पतंग उडवण्याची परंपरा आहे. यावेळी बाजारात एकीकडे तिळगूळ, तीळ दिसतात तर दुसरीकडे रंग-बेरंगी पतंग दिसतात. संक्रांतीला मोठ्या संख्येने आकाशात पतंग दिसतात, तर काही लोक आपल्या कुटुंबासोबत पतंग उडवतात. याशिवाय दिवाळीतही पंतग उडवला जातो. नुकताच ठाकरे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर […]

मकरसंक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : देशात संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशातील अनेक शहरात पतंग उडवण्याची परंपरा आहे. यावेळी बाजारात एकीकडे तिळगूळ, तीळ दिसतात तर दुसरीकडे रंग-बेरंगी पतंग दिसतात. संक्रांतीला मोठ्या संख्येने आकाशात पतंग दिसतात, तर काही लोक आपल्या कुटुंबासोबत पतंग उडवतात. याशिवाय दिवाळीतही पंतग उडवला जातो.

नुकताच ठाकरे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील बाजारात ‘ठाकरे’ सिनेमाची पतंग मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. मकरसंक्रांतीच्या काही दिवस आधीपासून लोक पतंग उडवत संक्रांतीचा आनंद लुटतात. सध्या बाजारात ‘ठाकरे’ नावाच्या पतंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मकरसंक्रांतीला पंतग उडवण्याचे धार्मिक महत्त्व

भगवान श्री राम यांच्या वेळेपासून भारतात पतंग उडवण्याची परंपरा आहे अस बोललं जातं. तर तमिळच्या तन्दनानरामायणानुसार, रामाने मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला होता आणि तो पतंग इन्द्रलोकमध्ये गेला होता.

मकरसंक्रांतीला पतंग उडवणे आरोग्यास लाभदायक

मकरसंक्रांतीला पतंग उडवणे आरोग्यास लाभदायक असते. तसेच सकाळच्या वेळेस पतंग उडवला तर ऊर्जा मिळते. यासोबत व्हिटॅमिन डी मिळते, ऊन्हामुळे आणि थंडीमुळे त्वचेच्या समस्यांपासूनही सुटका मिळते, असं म्हटलं जातं.

पतंग देतो प्रेमाचा संदेश

पतंगीला आझादी, आनंद आणि शुभ संदेशाचे प्रतीक मानलं जातं. बऱ्याच ठिकाणी काही लोक यावेळी तिरंगा पतंगही उडवतात. तसेच पतंग उडवल्याने मानसिक तणाव संतुलित राहते आणि मन प्रसन्न राहते असं म्हटलं जातं.

मकरसंक्रांतीला काही ठिकाणी लहान मुलांसाठी जत्रेचं आयोजन केले जाते. यावेळी लोक नाचतात, गाणी गातात आणि पतंग उडवतात. तर काहीजण पवित्र नदीत आंघोळ करतात. मकरसंक्रांतीला केलेले दान अक्षय फलदायी असते.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.