महिलांच्या शर्टची बटणे डाव्या, तर पुरुषांची उजव्या बाजूलाच का? वाचा इतिहास

काळानुरुप युनिसेक्स फॅशन आली आहे. स्त्री-पुरुष दोघेही घालू शकतील असे कपडे तयार केले जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का, महिलांच्या शर्टला डाव्या बाजूला बटणे का असतात, तर पुरुषांच्या शर्टला उजव्या बाजूला बटणे का लावली जातात. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा लेख पूर्ण वाचा.

महिलांच्या शर्टची बटणे डाव्या, तर पुरुषांची उजव्या बाजूलाच का? वाचा इतिहास
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 3:42 PM

महिलांच्या शर्टला डाव्या आणि पुरुषांच्या शर्टला उजव्या बाजूला बटणे का असतात, हे माहिती आहे का? याचं उत्तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की, पूर्वी शर्ट, पँट आणि जीन्स ही पुरुषांची ओळख आहे, तर साड्या, सूट आणि लेहंगा ही महिलांची ओळख दर्शवायचे. मात्र, आता काळानुरुप युनिसेक्स फॅशन आली आहे. स्त्री-पुरुष दोघेही घालू शकतील असे कपडे तयार केले जातात. पण, यातही अनेक ठिकाणी फरक दिसतो, तो नेमका काय, पुढे वाचा.

जगात स्त्री-पुरुषांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये दोघांच्या ड्रेसचाही समावेश आहे. पण, आता महिलांनीही शर्ट, पँट आणि जीन्स घालायला सुरुवात केली आहे. हे असलं तरी महिलांसाठी बनवलेल्या शर्टमधील बटणे पुरुषांच्या शर्टच्या तुलनेत विरुद्ध बाजूला का डिझाईन केली जातात? याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का, हेच आज आम्ही सांगणार आहोत.

महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला आणि पुरुषांचे शर्टची बटणे उजव्या बाजूला का लावले जातात? या प्रश्नाचे उत्तर शोधताना असं लक्षात आलं की, यामागे अनेक तर्कवितर्क लावले जातात. इतिहासाच्या काही पानांवर या प्रश्नाचे उत्तर आहे. ते आपण शोधण्याचा प्रयत्न करूया.

हे सुद्धा वाचा

इतिहास काय सांगतो?

बटणे लावण्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर त्यात गरजेनुसार डिझाईनचा समावेश होतो. असे म्हटले जाते की, प्राचीन काळी पुरुषांकडे उजव्या हातात तलवारी असत आणि स्त्रिया त्यांच्या डाव्या हातात मुलं पकडत असत. तर पुरुषांना आपल्या शर्टचे बटण काढायचे किंवा लावायाचे असेल तर त्यासाठी डावा हात वापरला जाईल. त्यामुळे शर्टची बटणे उजव्या बाजूला असावीत.

महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूलाच का?

याउलट महिलांनी बाळाला डाव्या बाजूला धरले, त्यामुळे त्यांना उजव्या हाताचा वापर करून बाळांना दूध पाजण्यासाठी शर्टचे बटण काढावे लागते. त्यामुळे डाव्या बाजूला बटणे तयार करण्यात आली होती.

नेपोलियन बोनापार्टचा आदेश?

इतिहासाशी निगडित काही तथ्ये सांगतात की, स्त्रियांच्या कपड्यांच्या डाव्या बाजूला बटणे लावण्याचा आदेश नेपोलियन बोनापार्टने दिला होता. नेपोलियन एका खास स्टाईलमध्ये उभा राहायचा, त्या दरम्यान शर्टच्या आत त्याचा एक हात असायचा. आणि बायका त्याच्या उभ्या भूमिकेची खिल्ली उडवू लागल्या होत्या, अगदी त्याची नक्कलही करू लागल्या होत्या. नेपोलियनला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने त्यांना रोखण्यासाठी डाव्या बाजूला स्त्रियांच्या कपड्यांमध्ये बटणे लावण्याचा आदेश दिला.

घोडेस्वारी हे एक कारण

असंही म्हटलं जातं की, जुन्या काळी स्त्रिया घोडेस्वारी करत असत. त्या आपला शर्ट वाऱ्यापासून रोखण्यासाठी डावीकडे बटणाचा शर्ट घालायच्या. डाव्या बाजूच्या बटणांमुळे त्यांच्या शर्टच्या आतील बाजूस उलट दिशेने हवा शिरते आणि त्यांना स्वार होण्यास मदत होते, असा युक्तिवाद करण्यात आला होता. तथापि, या किस्से कथांचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.

असाही युक्तिवाद

असाही युक्तिवाद केला जातो की, जेव्हा बटनयुक्त शर्ट किंवा ब्लाऊजची फॅशन जगात आली, तेव्हा असे कपडे श्रीमंत घराण्यातील स्त्रिया घालत असत. त्यांना तयार करण्यासाठी मेड (घरकाम किंवा काम करणाऱ्या महिला) होत्या. त्यामुळे त्यांना बटणाचे कपडे सहज घालता यावेत म्हणून बटणे विरुद्ध बाजूला ठेवण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.