मोबाईल डोक्याजवळ ठेवून झोपताय? वाईट्ट सवय, लगेच सोडा; नाही तर…

रात्री मोबाईल वापरण्याची वायफाय सुरू ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासानुसार, वायफाय राउटरपासून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे मस्तिष्कासाठी हानिकारक असतात. यामुळे अनिद्रा, डोकेदुखी, आणि रक्तदाबातील बदल होऊ शकतात. झोपताना वायफाय बंद करणे, मोबाईल डोक्यापासून दूर ठेवणे आणि रात्री मोबाईल वापरात मर्यादा ठेवणे गरजेचे आहे.

मोबाईल डोक्याजवळ ठेवून झोपताय? वाईट्ट सवय, लगेच सोडा; नाही तर...
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 6:08 PM

हल्ली प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. ज्यांना रात्रभर मोबाईल वापरण्याची सवय आहे. ते वाय फाय सुरू ठेवूनच झोपतात. काही लोक तर रात्रभर फोन पाहत नाहीत. झोपलेले असतात. पण वायफाय सुरू ठेवूनच मोबाईल डोक्याजवळ घेऊन झोपतात. असं करणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे शरीरावर प्रचंड परिणाम होतो. इंटरनेट सिग्नल शरीरासाठी घातक असतं. त्याचा काय परिणाम होतो याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.

‘नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ’ (NIH) च्या अभ्यासानुसार, Wi-Fi राउटरपासून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे मानवी मस्तिष्कासाठी हानिकारक असू शकतात. या किरणांचा सतत संपर्क होत राहिला, तर ते शरीरावर विविध प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात. याबाबतचं एक संशोधन झालं आहे. अनेक लोकांवर अभ्यास करण्यात आला आहे. त्यातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. जे Wi-Fi सुरू ठेवून फोन डोक्याजवळ ठेवून झोपतात, त्यांना अनिद्रा, डोकेदुखी किंवा मायग्रेन, तसेच रक्तदाबामध्ये बदल यांसारख्या समस्या निर्माण होतात.

दोन प्रकारची विकिरणे

  • आयोनायझिंग विकिरणे (जे मायक्रोवेव्ह उपकरणांत वापरले जाते).
  • नॉन-आयोनायझिंग विकिरणे (जे Wi-Fi, ब्लूटूथ उपकरणांमध्ये वापरले जाते).

आतापर्यंत नॉन-आयोनायझिंग विकिरणाचे गंभीर परिणाम फारसे सांगितले गेले नाहीत, पण सध्या शास्त्रज्ञ या विकिरणांमुळे मस्तिष्काच्या पेशीवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देत आहेत. 2011 मध्ये यावर एक अभ्यास केला गेला होता. त्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक विकिरणामुळे झोपेची समस्या होऊ शकते, असा दावा करण्यता आला होता. मोबाईलवर रात्री सतत राहणे, किंवा फोन डोक्याजवळ ठेवून झोपणे यामुळे अनेक लोकांना झोपेची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे अनिद्रा (इन्सोम्निया) देखील होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

सतर्क राहण्यासाठी काय करावे?

  • झोपताना Wi-Fi राउटर बंद करा.
  • जेव्हा फोन वापरत नाही, तेव्हा ब्लूटूथ स्पीकर किंवा राउटर बंद ठेवा.
  • फोन डोक्याच्या जवळ ठेऊन झोपा नका. फोन थोड्या अंतरावर ठेवा. राउटरही डोक्याच्या जवळ ठेवू नका.
  • रात्री मोबाईलवर राहण्याची सवय कमी करा, त्यामुळे समस्या कमी होईल.
  • तसेच मोबाईलच्या स्क्रीनकडे सतत पाहिल्याने नजर कमकुवत होण्याची शक्यताही असते.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.