हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणं चांगलं की वाईट?; गोष्ट छोटी पण…
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे आणि तोटे या लेखात स्पष्ट करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, थंड पाण्याने अंघोळ केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचा निरोगी राहते आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होते. मात्र, गरम पाण्याने अंघोळ करणे केसांना आणि त्वचेला हानीकारक आहे. थेट थंड पाणी डोक्यावर टाकू नये आणि आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
भारतात तीन ऋतू अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि तिन्ही ऋतू त्रासदायक ठरतात. उन्हाळ्यात प्रचंड ऊन असतं. हिवाळ्यात प्रचंड थंडी तर पावसाळ्यात झोडपून काढणारा पाऊस. त्यामुळे या तिन्ही ऋतूत लोकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं. हिवाळ्यात तर थंडीत अंघोळ करू नये असंच वाटतं. खासकरून दिल्ली, उत्तर प्रदेश, सिस्कीम, अरुणाचल आणि मेघालयासारख्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी थंडीत अंघोळ करणं म्हणजे महादिव्य काम असतं. अशावेली गरम पाण्याने लोक अंघोळ करतात. पण थंडीत थंड पाण्याने अंघोळ करणं चांगलं असतं की वाईट? काय योग्य आहे? शरीरावर त्याचा काय परिमाण होतो?
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्यावर स्ट्रोक येऊ शकतो किंवा पक्षाघात होऊ शकतो असं काही लोकांना वाटतं. तर थंड पाण्याने अंघोळ केल्यावर दिवसभर थंडी वाजत नाही, असं काहींना वाटतं. पण मतं काहीही असले तरी तज्ज्ञांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मताद्वारेच आपण हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणं चांगलं की गरम पाण्याने? याची माहिती घेणार आहोत.
थंडीत थंड पाण्याने अंघोळ करणे
श्री बालाजी ॲक्शन हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. अंकित बंशाले यांनी याबाबतची माहिती दिलीय. हिवाळ्यात अनेक लोक गरम पाण्याने अंघोळ करण्यावर भर देतात. परंतु त्याऐवजी सामान्य पाण्याने स्नान करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. सामान्यतः, हिवाळ्यात थंड पाण्याने स्नान केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, असं डॉ. बंशाले यांनी सांगितलं.
गार पाण्याने स्नान केल्याने त्वचा सुंदर आणि निरोगी राहते. यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात. व्यायाम आणि इतर शारीरिक कसरतीतही त्याने मदत होते. तसेच, थंड पाण्याने स्नान केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे मानसिक ताण कमी होतो, शरीर सक्रिय होते आणि रोजच्या जीवनात बरीच मदत होते.
गरम पाण्याचे परिणाम
थंड पाण्याने अंघोळ करणे कधीही चांगले. गरम पाणी त्वचा आणि केसांसाठी हानिकारक आहे. गरम पाणी केसांना हानी पोहोचवते, त्यामुळे केस तुटायला लागतात. तसेच, त्वचेसाठीही गरम पाणी हानिकारक आहे. गरम पाण्याने स्नान केल्याने त्वचेची ताजगी कमी होते. गरम पाण्याने स्नान करताना चांगले वाटत असले तरी त्याचे अनेक हानिकारक परिणाम आहेत.
अंघोळ करतांना थेट थंड पाणी डोक्यावर टाकू नका. हात आणि पायावर पाणी टाकल्यानंतरच डोक्यावर पाणी टाका. तुमची तब्येत ठीक नसले किंवा आपल्याला काही आरोग्य समस्याएं असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)