Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!

हिवाळ्याच्या या मोसमात रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात (Winter Diet Food).

Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 11:26 AM

मुंबई : आपल्याला नेहमी थंड हवामानात काहीतरी गरमागरम खावेसे वाटते. या मोसमात तळलेल्या पदार्थांचे सेवन देखील वाढते. ज्यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवण्यास सुरूवात होते. हिवाळ्याच्या या मोसमात रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात (Winter Diet Food). या गोष्टी दिवसभर उर्जा देतात. शिवाय शरीर उबदार व निरोगी ठेवतात आणि वजन देखील कमी करतात. चला तर, या गोष्टींबद्दल जाणून घेऊया… (Winter Diet Food should eat on empty stomach)

गरम पाणी आणि मध

थंड हवामानात, आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी आणि मधाने करा. मधामध्ये मुबलक प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स आणि एन्झाइम्स आढळतात. या गोष्टी आतड्यांना आतून स्वच्छ ठेवतात. कोमट पाण्यात मध मिसळून ते प्यायल्याने शरीरातील सर्व हानिकारक घटक बाहेर निघून जातात. याशिवाय वजन कमी करण्यासाठी देखील हे अत्यंत प्रभावी मानले जाते.

भिजलेले बदाम

भिजवलेल्या बदामांमध्ये मॅंगनीज, व्हिटामिन ई, प्रथिने, फायबर, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असतात. बदाम नेहमी रात्री भिजवून सकाळी खावेत. बदामच्या सालांमध्ये टॅनिन असते. जे शरीरातील पोषकद्रव्ये शोषण्यास प्रतिबंधित करते. बदाम भिजल्यानंतर त्यांना सोलणेदेखील सोपे होते. बदाम शरीराला पोषक घटक देण्याबरोबरच, शरीर आतून उबदार ठेवण्याचे कामही करतात (Winter Diet Food should eat on empty stomach).

सुकामेवा / ड्रायफ्रुट्स

सकाळी नाश्त्यापूर्वी मुठभर ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने पोट साफ राहते. हे केवळ पचन क्रिया सुधारत नाही तर, पोटातील पीएच पातळी संतुलित राखण्यास देखील मदत करतात. आपल्या रोजच्या आहारात मनुका, बदाम आणि पिस्ताचा समावेश करा. परंतु, या गोष्टी खाताना, त्या प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्या. नका अन्यथा शरीरावर पुरळ उठू शकते.

ओटमील

ओटमील सारखा चांगला नाश्ता दुसरा काहीही असू शकत नाही. जर आपल्याला कमी कॅलरी आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता खायचा असेल तर ओट्स खाणे फायदेशीर ठरते. हे शरीरातील हानिकारक घटकांचा निचरा करते आणि आतडे निरोगी ठेवते. ओट्स खाल्ल्याने जास्त काळ भूक लागत नाही आणि वजन देखील नियंत्रणात राहते (Winter Diet Food should eat on empty stomach).

पपई

आतडे निरोगी ठेवण्याबरोबरच, पपईच्या सेवनामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. रिकाम्या पोटी खाण्यासाठी पपई ‘सुपरफूड’ मानली जाते. पपई प्रत्येक हंगामात अगदी सहज उपलब्ध होते. आपण आपल्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करून शकता. पपई कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगची समस्या दूर करते आणि वजन देखील कमी करते.

भिजवलेले अक्रोड

बदामाप्रमाणेच अक्रोड भिजवून खाणे फायद्याचे आहे. रात्री भिजवून ठेवलेले अक्रोड सकाळी सकाळी रिकाम्या पोटी खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात करा. भिजवलेल्या अक्रोडमध्ये कोरड्या अक्रोडपेक्षा जास्त पोषक घटक असतात. रात्री किमान 2-5 अक्रोड भिजत घाला आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते खा.

(Winter Diet Food should eat on empty stomach)

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.