थंडीत कपडे पिळण्याचा नवीन देशी जुगाड, ४ कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहून महिलेचे केले भरभरून कौतुक
थंडीच्या हवामानात वॉशिंग मशिनमध्ये चुकून बिघाड झाला तर कपडे हाताने पिळून वाळत घालावे लागतात. अशावेळी हे देशी जुगाड तुम्हाला खूप उपयोगी पडेल, जे सध्या सगळीकडे खूपच व्हायरल होत आहे.
काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरलेली आहे. या दिवसांमध्ये थंडी वाढली आहे. त्यात या थंडीत थंड पाण्यात काम करण्याचे प्रत्येक महिलेला याचा सामना करावा लागतो. विशेषतः कपडे धुण्यासारख्या कामाचा विचार केल्यास अधिकच थंडी जाणवते. कारण ज्याकोणाकडे घरात वाशिंगमशीन नाहीये किंवा वाशिंग मशीन खराब झालेली असेल त्या महिलांना थंड पाण्यात कपडे हाताने धुवावे लागतात. तर अशावेळी ते देशी जुगाड तुमच्या कामी येतात, जे थंडीत थंड पाण्यात हात न टाकता करता येऊ शकतात. दरम्यान थंडीच्या दिवसात थंड पाण्यापासून बचाव करण्यासाठी एका महिलेने असाच एक देशी जुगाड करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो तुम्हाला मस्त जुगाड शिकवेल.
येथे पाहा व्हिडीओ – (
View this post on Instagram
)
कपडे पिळण्याचा नवीन देशी जुगाड
थंडीच्या दिवसात हाताने कपडे पिळायला नको म्हणून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला मॉप बकेट मध्ये कपडे पिळताना दिसत आहे. यात मॉपच्या साहाय्याने कपड्यातून पाणीही बाहेर पडत असून ड्राय होताना दिसत आहे. फ्लोअर मॉप बकेटमधून कपडे पिळतानाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, आतापर्यंत जवळपास ४ कोटी लोकांनी तो पाहिला आहे आणि जवळपास अडीच लाख लोकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे.
लोकांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर orinbabokk91 नावाच्या अकाऊंटने शेअर करण्यात आलेला आहे. तर हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हा देसी जुगाड आवडलेला आहे, तर काहींनी या व्हिडिओचा आनंदही घेतला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत युजर्सनी अतिशय मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं- काय डोकं लावलं आहे, मी आत्ताच विकत घेईन. तर काही युजर्सनी ही एक चांगली आयडिया असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने एन्जॉय करताना सांगितले की, आता मला ते कसे वापरावे हे माहित झाले आहे. अश्या अनेक गमतीशीर कमेंट्स या व्हिडिओला युजर्सने दिलेल्या आहेत.