Chanakya Niti : महिलांना कसे पुरूष आवडतात?, तुम्हीही जाणून घ्या गुपित !

Chanakya Niti : महिलांचं मन समजून घेणं खूप कठीण असतं असम म्हणतात. मनात काय आहे ते त्या स्पष्टपणे सांगत नाहीत. पण आज अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या महिलांना पुरूषांमध्ये खूप आवडतात, खूप आकर्षक वाटतात. खरंतर महिलांना पुरूषांमधील काही छोटे-छोटे गुण खूप भुरळ घालतात. त्या अतिशय सामान्य गोष्टी असतात, पण ते आकर्षक गुण प्रत्येक पुरूषामध्ये असतीलच असं नाही. असे गुण कोणते? चला जाणून घेऊया..

Chanakya Niti : महिलांना कसे पुरूष आवडतात?, तुम्हीही जाणून घ्या गुपित !
महिलांना कसे पुरूष आवडतात?
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 3:51 PM

महिलांचं मन समजून घेणं खूप कठीण असतं असम म्हणतात. मनात काय आहे ते त्या स्पष्टपणे सांगत नाहीत. पण आज अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या महिलांना पुरूषांमध्ये खूप आवडतात, खूप आकर्षक वाटतात. खरंतर महिलांना पुरूषांमधील काही छोटे-छोटे गुण खूप भुरळ घालतात. त्या अतिशय सामान्य गोष्टी असतात, पण ते आकर्षक गुण प्रत्येक पुरूषामध्ये असतीलच असं नाही. असे गुण कोणते? चला जाणून घेऊया..

बऱ्याच वेळेस असं होतं की पहिल्या भेटीतच किंवा एकदा पाहूव एखादी स्त्री एखाद्या पुरूषाकडे आकर्षित होते. हे आकर्षणाचे नियम असू शकतात का ? महिलांना पुरूषांकडे आकर्षित करतात अशी ती गोष्ट कोणती ? हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी बरंच संशोधनही केलं आहे. त्या शोधात असं सांगण्यात आलं आहे की, काही असे गुण असतात जे पुरूषांमध्ये दिसल्यास महिला त्यांच्याडे त्वरित आकर्षित होतात.

जबरदस्ती करणारे पुरूष नापसंत

रूटर यूनिव्हर्सिटीमधील एक मनोवैज्ञानिकाच्या सांगण्यानुसार जगभरातील स्त्रिया अभिव्यक्तींवर आधारित स्वारस्य दर्शवतात. जे पुरूष जबरदस्ती करतात, अधिकार गाजवतात ते स्त्रियांना इतके आकर्षक वाटत नाहीत. म्हणजेच पुरूषांनी आपल्याला समजून घ्यावे आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे , असे महिलांना वाटते. त्यांना जे वाटतं ते मनमोकळेपणाने बोलता यावं, असंही त्यांना वाटतं.

अशी असावी पर्सनॅलिटी

महागडे कपडे, मोबाईल्स, आलिशान गाडी आणि लाईफस्टाईल असलेले पुरूषच महिलांना आवडतात, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. एका संशोधनानुसार, एखादा पुरूष जर सायकल चालवत असेल तरी महिलांना परक पडत नाही. तुमचं व्यक्तीमत्व हे तुमच्या चेहऱ्यावरून समजतं. फक्त तुमची अशी पर्सनॅलिटी हवी की त्यांचं मन मोहून घेईल. तो तुमचा साधा, भोळा चेहराही असू शकतो. तुम्ही कदाचित खूप साधे कपडे घालत असाल पण तुम्ही ते क२री कसे करता, स्टाइल कशी आहे, यावरही बरंच काही अवलंबून असतं.

मोठ्या वयाचे पुरूष आवडतात

2010 साली करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, अशी माहिती समोर आली की, बहुतांश महिलांना त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले पुरूष आवडतात. ज्या महिला आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र झाल्या आहेत , त्या स्त्रिया शक्तिशाली आणि अधिक वयाचा पुरुषांकडे आकर्षित होतात. आत्मविश्वास आणि समजूतदारपणा जर आपण जगाबद्दल बोललो तर, स्त्री आणि पुरुष यांच्यातील वयातील अंतर नाहीसे झाले आहे. जास्त वयाचे पुरूष हे अनुभवी असल्याने स्त्रियांना ते अधिक भावतात. वाढत्या वयामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आणि शहाणपण येते.

हलकी स्टायलिश दाढी न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील संशोधकांनी 2013 साली केलेल्या अभ्यासात एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली. साफ चेहरा, हलकीशी दाढी, थोडी मोठी दाढी असलेल्यांना स्त्रियांची पसंती मिळाली. हलकी, स्टायलिश दाढी असलेलेल पुरूष सर्वात आकर्षक होते, असे अनेक महिलांनी नमूद केले. आजकाल जगभरातील तरूणांपासून ते पुरूषांमध्ये हलक्या दाढीचा ट्रेंड आहे. त्यामुळे ते साफ, स्वच्छ आणि ऑर्गनाईज्ड दिसतात.

सेन्स ऑफ ह्यूमर महिलांना दयाळू आणि सौम्य स्वभावाचे पुरुष आवडतात. साधारणपणे, स्त्रियांना नेहमीच असे पुरुष आवडतात, जे त्यांच्याशी सभ्य आणि विचार करून वागतात. तसेच चांगलान्स ऑफ ह्यूमर असलेल्या पुरूषांकडेही स्त्रिया आकर्षित होतात. अशा पुरूषांचा स्वभाव बहुतांश स्त्रियांना आवडतो. त्यांच्याप्रती त्यांना एक खास भावना वाटू लागते.

अनेक अभ्यास असेही सूचित करतात की स्त्रिया त्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात जे त्यांना हसवू शकतात. अशा स्त्रियांना नेहमी सेन्स ऑफ ह्यूमर आवडतो. जे पुरुष त्यांना हसवतात ते केवळ चैतन्यशील दिसत नाहीत तर त्यांच्याकडे जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असतो.

अशी पर्सनॅलिटी असलेले पुरूष स्त्रियांना आवडतात, आणि त्या त्यांच्याकडे आकर्षित होतात.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.