आपल्याकडे फक्त ‘एकच पृथ्वी’… ती वाचविण्यासाठी करा प्रयत्न! पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या, जागतिक पर्यावरण दिनाची यंदाची थीम!

जागतिक पर्यावरण दिन 2022: आज 5 जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. या दिवशी पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पर्यावरण सुरक्षीत ठेवण्यासाठी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे ते जाणून घेऊया.

आपल्याकडे फक्त ‘एकच पृथ्वी’... ती वाचविण्यासाठी करा प्रयत्न! पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या, जागतिक पर्यावरण दिनाची यंदाची थीम!
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 6:57 PM

मुंबईः जागतिक पर्यावरण दिन 2022 दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पर्यावरणाबाबत जनजागृती (Awareness) करणे हा आहे. हा दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यादरम्यान पर्यावरणाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती दिली जाते. प्रदूषणाची वाढती पातळी केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर मानवासाठीही धोकादायक (Dangerous) ठरत आहे. त्यामुळे अनेक प्राणीही नामशेष होत आहेत. लोकांना आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

जागतिक पर्यावरण दिनाची थीम यावर्षी जागतिक पर्यावरण दिन 2022 ची थीम ‘फक्त एक पृथ्वी’ आहे. म्हणजे आपल्याकडे ‘एकच पृथ्वी’ आहे. ते वाचवण्यासाठी वेळ कमी आहे. अशा परिस्थितीत आपण पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. आपल्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी प्रदूषणमुक्त (Pollution free) आणि हरित वातावरण आवश्यक आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचा इतिहास

जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात 1972 मध्ये झाली. हा दिवस साजरा करण्याची पायाभरणी संयुक्त राष्ट्रांनी ५ जून १९७२ रोजी केली होती. या दिवसानंतर दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाऊ लागला. पर्यावरण दिन साजरा करण्याच्या उद्देशाने जगभरात प्रदूषणाचा धोका सातत्याने वाढत आहे. हा धोका रोखण्याच्या उद्देशाने दरवर्षी पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरणाबाबत लोकांना जाणीव करून दिली जाते. पर्यावरण सुरक्षित ठेवता यावे यासाठी अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती दिली जाते.

दैनंदिन जीवनात काही साधे बदल करा

तुमचे वाहन चालवण्याऐवजी पायी चालणे सुरू करा

सायकल चालवणे किंवा तुमच्या रोजच्या प्रवासाच्या गरजांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू करा.

घाण पसरवणे किंवा रस्त्यावर थुंकणे टाळा.

तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सामुदायिक मोहिमांमध्ये सहभागी व्हा.

प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू वापरणे टाळा.

खोली सोडण्यापूर्वी दिवे, पंखे बंद करा आणि वीज वाचवा.

हिवाळ्यात हीटर वापरणे टाळा आणि त्याऐवजी उबदार कपडे घाला.

उन्हाळ्यात एअर कंडिशनरचा अतिवापर टाळा.

प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर अवलंबून न राहता तुम्ही खरेदीला जाता तेव्हा तुमची स्वतःची शॉपिंग बॅग ठेवा.

वापरात नसताना नळ चालू न ठेवून पाण्याची बचत करा.

शॉवर वापरण्याऐवजी बादलीत पाणी भरून आंघोळ सुरू करा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.